यापुढे चौथीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व नसणार.

आपण लहानपणापासून शिकत आलेले शिक्षण व त्यातील फायदे, तोटे यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न MIEB या शिक्षण मंडळाने केला आहे. या निर्णयाचा वेगवेगळ्या स्तरांवर विरोध होत आहे. ही बातमी खूप वेगळ्या पद्धतीने व अपुऱ्या महितीनिशी प्रसारित केली जात आहे असे माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे मत आहे.

काय आहे MIEB?

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ अंतर्गत महाराष्ट्रात एकूण ८१ शाळा कार्यान्वित आहेत. या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम हा मुलांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आखण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुले सर्वच क्षेत्रात पुढे येण्यासाठी हा असा उपक्रम आहे जो भविष्यात मुलांना एक योग्य स्थिरता देऊ शकेल. 

कसा असेल अभ्यासक्रम?

MIEB ने चौथीपर्यंत काहीही शिक्षण तोडलेले नाही. विषयांची वर्गवारी न करता मुलगा सरावाने किती शिकू शकतो याकडेच त्यांचे लक्ष आहे. इयत्ता चौथीत असलेले इतिहासाचे पुस्तक यातदेखील बदल करण्यात आलेला आहे. शिवरायांचा इतिहास हा MIEB अंतर्गत आता ६ वीत शिकवला जाईल. 

कसा होतोय विरोध?

स्वतंत्र शिक्षण मंडळाची गरजच काय?

– १९९१ व २०१० साली चौथीच्या पुस्तकातील इतिहास न बदलण्याचा ठराव विधिमंडळात करण्यात आला होता तरीही हे असे पाऊल म्हणजे सरकारचा “कट” आहे. 

– महाराष्ट्रातील मुले आता शिक्षण पातळीवरून विभागली जाणार.

सारांश      

पूर्ण बातमीचा सारांश पाहता असे समजेल की शैक्षणिक स्पर्धा ही फक्त मुलांपुरतीच मर्यादित न राहता आता शिक्षण मंडळेदेखील यात उतरली आहेत. सीबीएसई, आयसीएसई या शिक्षण मंडळातील मुलांबरोबर महाराष्ट्रातील मुलेदेखील स्पर्धा करू शकतील व शैक्षणिकदृष्ट्या खूप सक्षम होतील असा MIEB चा हेतू आहे. तरी फक्त अभ्यासक्रमातील बदलामुळे राजकारणी या मुद्याचा वापर करू पाहतायेत.   

हे सुद्धा वाचा- हल्ली आपण खरंच मराठी बोलतो का?

Leave a Comment