तंबाखूचे दुष्परिणाम – मराठी भाषण  |Tambakhuche Dushparinam Bhashan Marathi |

प्रस्तुत लेख हा तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम (Tambakhuche Dushparinam Marathi Speech) या विषयावर आधारित एक मराठी भाषण आहे. तंबाखू सेवन केल्याने मानवी आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती या भाषणात दिलेली आहे.

तंबाखूचे खाण्याचे तोटे – मराठी भाषण | Tambakhu Khanyache Tote – Marathi Bhashan |

प्रस्तावना –

अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग, आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर आधारित एक भाषण सादर करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती…

भाषण –

मनुष्याच्या विकासात शारिरीक आरोग्य हे एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यासंदर्भात शारिरीक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी आपल्याला काही घातक सवयींपासून अगोदरच दूर राहावे लागते. तंबाखूचे सेवन ही देखील अशी एक घातक सवय आहे ज्यामुळे मनुष्याच्या आरोग्यात बाधा निर्माण होत असते.

तंबाखूच्या सेवनामुळे आजपर्यंत कितीतरी लोकांना स्वतःचे प्राण गमवावे लागलेले आहेत. सुरुवातीला मज्जा म्हणून जडलेली सवय ही कालांतराने अत्यंत घातक परिणाम घडवून आणत असल्याने मनुष्याने त्यापासून अगोदरच सावध असणे गरजेचे आहे.

संपूर्ण जगभरात तंबाखू खाण्याचे प्रमाण जास्त असल्याने दर 8 सेकंदाला एका व्यक्तीचा त्यामुळे मृत्यू होत आहे. तंबाखूमुळे विकार जडण्याची प्रक्रिया ही खूप मंदगतीने होत असल्याने बहुतेकदा आपण ती सवय टाळण्याचा प्रयत्न करत नाही.

तंबाखूच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. छातीत दुखणे, हृदय विकाराचा झटका येणे, मेंदूचे विकार असे अन्य विकार देखील जडू शकतात.तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा किंवा किडनीचा कर्करोग होऊ शकतो.

तंबाखू ही शरीरासाठी घातक आहे याची जाणीव लहानपणीच करून देणे ही एक सामजिक गरज आहे. एकदा सवय लागल्यानंतर ती सोडणे ही खूप अवघड गोष्ट असल्याने ती अगोदरच लावून न घेणे केव्हाही श्रेयस्कर ठरते.

तारुण्यात असताना आपल्याला अनेक व्यसने आकर्षित करत असतात. आपल्याकडून आसपास असणाऱ्या लोकांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे त्यांच्या सवयी देखील आपल्याला जडू शकतात. मज्जा आणि आनंद या बाबींचा खोटा आधार घेऊन व्यसनांची जाहिरात सर्वत्र केली जाते.

काही प्रसिद्ध अभिनेते आणि खेळाडू अशा जाहिराती सातत्याने करत असतात. त्यामुळे अविकसित बुद्धी आणि चंचल मनाची तरुणाई अशा जाहिरातींचे बळी पडतात. परिणामी तंबाखू, गुटखा, दारू, सिगारेट अशा व्यसनांची सवय लावून घेतात.

पूर्वीचा समाज हा अशिक्षित असल्याने तंबाखूचे व्यसन ही अत्यंत सामान्य गोष्ट होती. परंतु जसजसे वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होत गेले तसतसे मानवाला समजू लागले की तंबाखूचे व्यसन हे अनेक आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण असू शकते.

आजचे युग हे माहिती युग आहे. इंटरनेटचा वापर करून तुम्ही तंबाखूच्या अन्य घातक परिणामांची माहिती मिळवू शकता. स्वतःच्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून सुरुवातीलाच तंबाखूचे सेवन न करण्याचा निर्णय घेऊ शकता.

तंबाखूने आपले आरोग्य तर बिघडतेच त्याशिवाय आणखी इतर व्यसने करण्याची तलफ देखील जागृत होते. परिणामी आपले आयुष्य हे निराशेच्या गर्द छायेत जाऊन विसावते. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबियांना आणि समाजाला सहन करावा लागतो.

तंबाखू सेवन करण्याचे तोटे लक्षात घेता आपली सामजिक व वैयक्तिक जबाबदारी आणखीनच वाढते. तंबाखू विरोधी जनजागृती करणे, तंबाखूचे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणे, व्यसन करण्यापेक्षा इतर उदात्त गोष्टीने व्यक्तिमत्त्व भारावलेले असणे, अशा बाबी आपण समाजात रुजवू शकतो.

आपले मन जर चांगल्या सवयी आणि उत्तम व्यक्तींच्या संगतीने व्याप्त झाले तर आपल्याला देखील एका आनंदी आणि यशस्वी जीवनाची विधायक मुल्ये समजू लागतील. अशा विधायक आणि नैतिक मुल्यांचा आधार घेऊन आपण तंबाखू आणि अन्य व्यसनांना आपल्यापासून कायमचे दूर ठेवू शकतो.

तंबाखूचे दुष्परिणाम हे मराठी भाषण (Tambakhuche Dushparinam Bhashan Marathi) सर्वांनी शांतचित्ताने ऐकल्याने मी सर्व मान्यवर व्यक्ती व श्रोत्यांचा आभारी आहे. धन्यवाद!

Leave a Comment