माझा डॉक्टर (कोविड अभियान) – मराठी निबंध | Majha Doctor Marathi Nibandh |

फॅमिली डॉक्टरांनी कोरोना काळात सर्वोपरी मदत करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानिमित्ताने माझा डॉक्टर ही संकल्पना समोर आणली. त्याची संपूर्ण माहिती होण्यासाठी माझा डॉक्टर हा मराठी निबंध (Majha Doctor Marathi Nibandh) लिहावा लागतो.

माझा डॉक्टर मराठी निबंध | Majha Doctor Essay In Marathi |

कोरोना विषाणूचे संक्रमण वाढले असता प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायला हवी. ती काळजी घेण्यासाठी आणि रुग्णांना अत्यावश्यक सेवा जलद गतीने मिळण्यासाठी आता डॉक्टरांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे “माझा डॉक्टर” या संकल्पनेबद्दल सूचित केले.

भारतात आणि विशेष करून महाराष्ट्रात कोरोना संसर्ग खूप वाढलेला आहे. कोरोना बाधा झालेले लोक आणि लक्षणे दिसून येत असलेले लोक अशा सर्वांना आरोग्य सुविधा मिळत नाहीयेत. त्यामुळे चिंतेचे आणि काळजीचे वातावरण तयार झालेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्यनिहाय औषध वाटप आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली. टास्क फोर्समध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. माझा डॉक्टर या अभियानात त्या तज्ञ व्यक्तींची सुद्धा मदत घेतली जाणार आहे.

प्रत्येक कुटुंब आणि नागरिक जाणतो की स्वतःला एक फॅमिली डॉक्टर असणे किती गरजेचे आहे. उपचार घेताना आपल्याला त्यांची मदत तर होतेच शिवाय त्यांनीही नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारल्यास आणि माझा डॉक्टर म्हणून मार्गदर्शन केल्यास नक्कीच या महामारीच्या काळात त्याचा फायदा होऊ शकेल.

डॉक्टरांचे मार्गदर्शन नेहमीच फायदेशीर ठरते आणि आता तर परिस्थिती देखील तशीच आहे की स्वतः डॉक्टरांनी नागरिकांशी आणि रुग्णांशी संवाद करणे गरजेचे आहे. असे केल्याने कोरोना विषाणू संक्रमण सुरुवातीलाच रोखले जाऊ शकते आणि कोरोनाची तिसरी लाट येण्यापासून आपण वाचू शकतो.

माझा डॉक्टर ही संकल्पना सूचित करण्याची कारणे देखील तशीच आहेत. कोरोना नसलेल्या व्यक्तींना सुविधा मिळतात आणि खऱ्या गरजू व्यक्तींना सुविधांपासून दूर ठेवले जाते. त्या अगोदर फॅमिली डॉक्टरांनीच व्यवस्थित तपासणी करून लक्षणे ओळखल्यास रुग्णांना लगेच उपचार उपलब्ध करून देता येतील.

आपल्या परिसरातल्या कोविड उपचार केंद्रांशी संपर्क साधून खासगी डॉक्टरांनी तेथे काही सेवा देता येऊ शकते का? ते पाहिले पाहिजे. ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याची पूर्ती लवकरच होईल आणि डॉक्टरांना उपचार देण्यात त्याची सहाय्यता होईल.

कोविड काळात सर्व डॉक्टरांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. भितीयुक्त वातावरण निर्मिती करणे गरजेचे नाही तर योग्य ती मदत, दिलासा आणि उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे माझा डॉक्टर या संकल्पनेचा पाठपुरावा झाल्यास नक्कीच आपल्या सभोवताली असणाऱ्या कोरोना विषाणूवर मात करणे आपल्याला शक्य होईल.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला माझा डॉक्टर हा मराठी निबंध (Majha Doctor Marathi Nibandh) आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment