महात्मा जोतीराव फुले यांचे संदेश ! Mahatma jotirao phule quotes in Marathi |

महात्मा जोतीराव फुले हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी सत्याचा आणि खऱ्या मानवतेचा पुरस्कार आयुष्यभर केला. मानवी सामाजिक व्यवस्थेला जातीव्यवस्था आणि स्त्री-पुरुष भेदभाव कसा पोखरून काढत आहे, याचे मर्म ते जाणत होते.

महात्मा जोतीराव फुले यांचे विचार (Mahatma jotirao phule quotes in Marathi) हे समाजाला नेहमीच प्रेरक ठरले आहेत. त्याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात करण्यात आला आहे. त्यांचे सुंदर विचार तुम्ही नक्की ग्रहण करण्याचा प्रयत्न करा.

महात्मा जोतीराव फुले यांचे अप्रतिम सुविचार | Mahatma Jotirao Phule Suvichar |

  • सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚ सुख मिळेल. दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚ सुख मिळणार नाही, हे निश्चित!
  • आर्थिक असमानतेमुळेच शेतकर्‍यांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
  • दोन तुकडे करायला एक वार फार झाला, पण काही वेळा त्याची भारी किंमत मोजावी लागते.
  • क्रांतीसाठी प्रत्येकाला लढायला लागते, ते आपले वडील असो, भाऊ असो, शेजारी कोणी असो किंवा शत्रू असो, संघर्षाशिवाय कोणी जिंकले नाही आणि जिंकणारसुद्धा नाही.
  • एखादे चांगले काम पूर्ण कराच पण त्याच्यावर वाईट उपायांचा वापर करू नका.
  • भारताच्या राष्ट्रीयतेच्या भावनेचा विकास तेव्हाच होईल जेव्हा देशामध्ये जात पात सोडून सर्वांना समान हक्क मिळेल.
  • जेव्हा लोक तुमच्या संघर्षामध्ये भाग घेतील तेव्हा कधीच जात बघू नका आणि विचारूसुद्धा नका.
  • जीवनाची गाडी दोन चाकावर कधीच चालत नाही, त्याला गती तेव्हाच मिळते जेव्हा मजबूत बंधन तयार होते.
  • स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समानतेचे शिक्षण आवश्यक आहे.
  • कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
  • स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो, कधी जातीचे तर कधी धर्माचे! धर्म महत्वाचा नाही माणुसकी असली पाहिजे.
  • देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.
  • मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही?
  • दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये.
  • स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.
  • सत्यपालन हाच धर्म! बाकीचे सर्व अधर्म आहेत.
  • स्त्रियांना एका तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
  • विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली |
    नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |
    वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले!

महात्मा जोतीराव फुले यांचे सुविचार (Mahatma jotirao phule quotes in Marathi) तुम्हाला आवडले असतील तर नक्की तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment