इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे – महत्त्वाच्या टिप्स | Intraday Trading Tips in Marathi |

प्रस्तुत लेखात इंट्राडे ट्रेडिंग करताना घ्यावयाची काळजी अथवा इंट्राडे ट्रेडिंग कसे करावे? (Intraday Trading Tips in Marathi) याबद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवसात शेअर्स खरेदी अथवा विक्री करून व्यापार करणे. त्यातून फायदा आणि तोटा दोन्ही संभव आहे.

इंट्राडे ट्रेडिंगसाठी शेअर्स कसे निवडावेत? (Intraday Trading Tips in Marathi)

१. गुंतवणूक रक्कम –

सर्वप्रथम तुमची गुंतवणूक रक्कम किती असणार आहे हे पडताळून पाहा. कारण ट्रेंडनुसार फायदा – तोटा होणार असला तरी तुमची शेअर्सची संख्या ही तुमच्याकडे असणाऱ्या गुंतवणुकीच्या रक्कमेवर अवलंबून असते. त्यानुसारच फायदा होत असतो.

२. मार्जिन –

इंट्राडे ट्रेडिंगसाठी ब्रोकर तुम्हाला मार्जिन देत असतो. समजा 2000 रुपयांचा शेअर असेल तर तो तुम्हाला कमी किंमतीत मिळतो. त्यामुळे कमी रक्कमेत सुद्धा तुम्ही जास्त शेअर्स घेऊ शकता.

ब्रोकर किती मार्जिन देत आहे ते पडताळून पाहावे कारण कमी मार्जिन असल्यास जास्त शेअर्स विकत घेता येत नाहीत परिणामी होणारा लाभ कमी असतो. 2000 रुपयांच्या शेअर वर 5x मार्जिन असेल तर तो तुम्हाला 400 रुपयांना मिळतो.

३. ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या (High Volume Shares) –

ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यास ट्रेंड सतत बदलत राहतो. त्यामुळे नफा होवो अथवा तोटा, ते तुमच्या निरीक्षण आणि हुशारीवर अवलंबून असेल पण नक्कीच तो शेअर खरेदी किंवा विक्री करावा.

High volume शेअर्स नसतील तर मात्र दिवसभर पैसे गुंतवून ठेवून हवा तसा नफा प्राप्त करता येत नाही.

४. शेअर्सची अस्थिरता (Volatility) –

शेअर्सची अस्थिरता (Volatility) जास्त असल्यास तो शेअर  निवडावा कारण अस्थिर पोझिशनवर तुम्ही निर्णय घेऊ शकता की शेअर खरेदी करायचा की विक्री करायचा.

५. स्टॉप लॉस आणि सेलिंग लिमिटचा वापर –

स्टॉप लॉस (Stop Loss) म्हणजे तुम्हाला होणाऱ्या तोट्याची रक्कम फिक्स करून ठेवणे आणि ट्रेडिंग करणे. त्यामुळे त्या रक्कमेपर्यंत तोटा झाला की आपोआप पोझिशन क्लोज होते. शेअर्सची अस्थिरता जास्त असल्यास नक्कीच स्टॉप लॉसचा वापर करावा.

सेलिंग लिमिट (Selling Limit) म्हणजे होणाऱ्या फायद्याची रक्कम फिक्स करून ठेवणे. काहीवेळा आपल्याला सतत ट्रेंड पाहणे शक्य नसल्यास या पद्धतीचा वापर करू शकता.

• महत्त्वाची टीप – Important Note

ट्रेडिंग करणे ही एक प्रकारची रिस्कच आहे. नफा होणे किंवा तोटा होणे हे सर्वस्वी तुमच्या नियंत्रणात नसते. ट्रेंडमधील निरीक्षण आणि शेअर्सबद्दल माहिती तुम्हाला नफा मिळवून देते तर निष्काळजीपणे आणि अंदाजे ट्रेडिंग केल्याने तोटा होतच असतो.

ट्रेडिंगमधील गुंतवणूक ही सर्वस्वी वैयक्तिक जबाबदारी असल्याने रिस्क फ्री ट्रेडिंग करणे हेच तुमच्या हातात आहे. संपूर्ण लेख हा फक्त माहिती स्वरूप आहे. कोणालाही आर्थिक तोट्यात घेऊन जाणे असा उद्देश्य नसल्याने तुम्ही या सर्व माहितीचा अंदाज आणि अनुभव घेऊन ट्रेडिंग करावी, ही विनंती!

तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग कशी करावी? (Intraday Trading Tips in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment