इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती । Intraday Trading in Marathi |

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांना शेअर मार्केटबद्दल प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे अत्यावश्यक आहे. शेअर मार्केटमधीलच एक गुंतवणूक पर्याय म्हणून इंट्राडे ट्रेडिंग केले जाते. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती (Intraday Trading in Marathi) हा लेख तुम्हाला उपयुक्त ठरेल.

What is Intraday Trading in Marathi | इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय?

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचा एक प्रकार आहे. यामध्ये एका दिवसामध्ये शेअर विकत (Buy) घेऊ शकतो आणि विकू (Sell) शकतो. यासाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट खोलवे लागेल (Open trading account)

सकाळी घेतलेला शेअर सायंकाळपर्यंत विकावा लागतो. इंट्राडे ट्रेडिंगची वेळ सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत असते. या वेळेदरम्यानच तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्यामध्ये व्यक्तीने 3:10 अथवा 3:20 पर्यंत शेअर पोझिशन एक्झिट करायची असते.

तुम्ही घेतलेला शेअर जर विकला नाही तर आपोआप दुपारी 3:30 वाजता तो शेअर आहे त्या पोझिशनला विकला जातो. ज्यामध्ये तो शेअर नफा अथवा तोट्यात असू शकतो.

तुम्ही वेळेत शेअर न विकल्याने ब्रोकर तो शेअर विकून टाकतो आणि त्याचा दंड म्हणून काही रक्कम (Penalty) वजा होते.

त्यामुळे शेअर्स विकत घेतल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की best Price ला विकला जाईल त्या वेळीच तो विकून टाकावा कारण सतत चढ-उतार होत असल्याने तुम्ही तोट्यात पण जाऊ शकता.

• इंट्राडे ट्रेडिंग मार्जिन (Intraday Trading Margin) –

इंट्राडे ट्रेडिंग मार्जिन हे इंट्राडे ट्रेडिंगचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही कमी किमतीमध्ये जास्त शेअर खरेदी करू शकता. तुमचा ब्रोकर त्यासाठी मार्जिन देत असतो. त्यामध्ये शेअर्सची संख्या देखील महत्त्वपूर्ण ठरते.

समजा शेअरची किंमत 200 रुपये असेल. त्यावर ब्रोकर समजा 10× मार्जिन देत असेल तर तुम्हाला तो शेअर एकूण 20 रुपये किंमतीला विकत घेता येतो (10 × 20 = 200). म्हणजेच होणारा नफा आणि तोटा त्याच प्रमाणात असतो.

एक शेअर 20 रुपयेला मिळत असल्याने तुम्ही शेअर्सची संख्या (Number of Shares) वाढवू शकता आणि त्याच प्रमाणात फायदा देखील मिळवू शकता. जेवढी शेअर्सची संख्या जास्त तेवढा फायदा जास्त असतो.

समजा 20 रुपये किमतीचे तुम्ही 100 शेअर्स घेतले तर शेअर एका अंकाने वर गेला किंवा खाली आला तर फायदा आणि तोटा 100 रुपयेच होत असतो. म्हणजे त्यासाठी 200 रुपयांचा शेअर 201 किंवा 199 रुपये असा चढला पाहिजे किंवा उतरला पाहिजे.

शेअर खरेदी केला असेल तर शेअरची किंमत वाढल्यावर फायदा होतो आणि शेअर विकला असेल तर शेअरची किंमत खाली आल्यावर फायदा होतो.

आता समजा ट्रेडिंग करताना त्या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आणि तुम्ही तो शेअर विकलात तर तुम्हाला मिळणारी रक्कम ही मार्जिनच्या प्रमाणात असते.

शेअर खरेदी केला असेल तर पोझिशन एक्झिट करताना त्याला विकावे लागते आणि शेअर विकला असेल तर पोझिशन एक्झिट करताना त्याला विकत घ्यावे लागते.

• इंट्राडे ट्रेडिंग फायदे – (Benefits of Intraday Trading In Marathi)

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कमी किमतीमध्ये जास्त शेअर खरेदी करू शकता.

कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त पैसे कमावण्याची संधी असते.

शेअर मार्केटमध्ये जास्त काळ गुंतवणूक असली तरी तुम्ही प्रत्येक दिवशी देखील इंट्राडे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवू शकता.

सध्या मोबाईलमध्ये ट्रेडिंगचे ऑनलाईन ऍप्लिकेशन्स उपलब्ध असल्याने तुम्ही त्यांचा वापर करून घरबसल्या ट्रेडिंगचा अनुभव घेऊ शकता.

तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती (Intraday Trading in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “इंट्राडे ट्रेडिंग – संपूर्ण माहिती । Intraday Trading in Marathi |”

Leave a Comment