गवती चहा – संपूर्ण माहिती | Lemon Grass Information In Marathi |

गवती चहा पिण्याने शारिरीक आणि मानसिक लाभ होतात. प्रस्तुत लेखात गवती चहाविषयी (Lemon Grass Information In Marathi) संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

गवती चहा हा आपण पितो त्याप्रमाणे नियमित चहा किंवा ग्रीन टी चा प्रकार नाहीये. ते एक रोप आहे ज्याची पाने खुडून पाण्यात अथवा चहात मिसळल्यानंतर एक वेगळाच सुगंध प्राप्त होतो.

गवती चहा मराठी माहिती | Lemon Grass Marathi Mahiti |

शास्त्रीय नाव – सिंबोपोगन सायट्रेटस (Cymbopogon Citratus)

गवती चहाला विविध भाषेत वेगवेगळी नावे आहेत, संस्कृत भाषेत सुगंध भूतृण, हिंदी भाषेत गंधबेना तर इंग्रजी भाषेत लेमनग्रास असे संबोधले जाते.

गवती चहा ही उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांत वाढणारी एक सुवासिक तृणवर्गीय वनस्पती आहे. गवती चहा ही वनस्पती आशिया, आफ्रिका, युरोप, व ऑस्ट्रेलिया या खंडांत आढळते.

गवतासारखी दिसणारी झुबकेदार एकदलीय वनस्पती १ ते २ मी. उंच वाढते. पाने टोकाला निमुळती होत गेलेली असतात. त्यांचा रंग हिरवा असतो. या रोपाचे खोड जमिनीत वाढते. गवती चहाची मुळे तंतुमय आणि दाटीवाटीने वाढलेली असतात.

भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत गवती चहा जास्त प्रमाणात आढळतो.

गवती चहाचे फायदे | Benefits of Lemon Grass in Marathi |

• गवती चहाची पाने नियमित चहात टाकली तर चहाला एक वेगळीच सुगंधित चव येते. गवती चहा पिण्याने संपूर्ण शरीरात ऊर्जेचा संचार होतो. मानसिक ताणतणाव दूर होतात.

• गवती चहा पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.

• वरचेवर डोकेदुखी, अंगदुखी जाणवत असेल तर गवती चहा पिल्याने ती दुखणी दूर होण्यास मदत होते.

• सर्दी, ताप आल्यास गवती चहा प्यावा तसेच गवती चहाचा काढा देखील उपयुक्त ठरतो.

• गवती चहा पाण्यात उकळवून पिल्याने पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते.

• गवती चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका कमी होतो.

गवती चहाचे अन्य उपयोग | Lemon Grass Uses In Marathi |

गवती चहाचा अर्क देखील बाजारात उपलब्ध आहे त्यास अर्कास ‘ऑइल ऑफ व्हर्बेना’ किंवा ‘इंडियन मेलिसा ऑइल’ असे म्हणतात.

गवती चहा रोपाच्या पानातील तेल ऊर्ध्वपातन पद्धतीने काढू शकतो. हे तेल कुष्ठरोग, त्वचाविकार, सांधेदुखी, उपदंश, कफ आणि वात या विकारांत गुणकारी आहे.

सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांत होतो.

तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहण्याचा अथवा छपाईचा कागद बनवू शकतो.

गवती चहाच्या पानांचा काढा ज्वरनाशक आहे.

साठवणीच्या धान्यांत कीड लागू नये म्हणून गवती चहाच्या पानांचा वापर करतात.

गवती चहाची पाने स्वच्छ धुवून चघळल्यास तोंडाची दुर्गंधी आणि जंतू नष्ट होण्यास मदत होते. दात आणि हिरड्या मजबूत बनतात.

गवती चहा कसा तयार करावा? Lemon Grass Tea Recipe In Marathi |

गवती चहाच्या पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर उकळतात किंवा शुद्ध पाण्यात फक्त गवती चहाची पाने टाकून तो तसाच पिला जातो.

गॅसवर पाणी गरम करा. त्या पाण्यात गवती चहाच्या पानाचे तुकडे उकळवून घ्या. त्याला सुगंध प्राप्त झाल्यावर त्यात चहा पावडर आणि साखर टाका.

चहा उकळल्यावर हवे असल्यास दूध टाका अथवा तसाच कोरा चहा प्या.

तुम्हाला गवती चहा – संपूर्ण माहिती (Lemon Grass Information In Marathi) हा लेख आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment