संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला जातो, त्या संपूर्ण दिवसाचे वर्णन स्वातंत्र्यदिन या मराठी निबंधात (Independence Day Essay In Marathi) करावयाचे असते.
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन निबंध | Swatantrya Din Marathi Nibandh |
दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. तो दिवस संपूर्ण भारतात स्वांतत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. सर्व वयोगटातील भारतीय लोक हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करतात.
शाळा, सरकारी कार्यालये आणि संस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असतो. ज्यामध्ये सकाळी सर्व कर्मचारी लोक आणि नागरिक मिळून भारतीय झेंड्याला अभिवादन करतात आणि मानवंदना देतात.
शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर मुलांकडून विविध उपक्रम साजरे केले जातात. झेंडावंदन स्थळी रांगोळी काढली जाते, पुष्पे वाहिली जातात. शाळेत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यानंतर राष्ट्रगीत आणि समुहगीते सादर केली जातात.
स्वातंत्र्यदिनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रभातफेरी काढली जाते. विविध प्रकारच्या देशभक्तीपर आणि प्रेरणादायी घोषणा दिल्या जातात. कला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात ज्यांनी अतुल्य असे यश प्राप्त केले असेल त्यांचा देखील सत्कार केला जातो.
शिक्षक अथवा उपस्थित मान्यवर स्वातंत्र्याच्या घटना तसेच क्रांतिकाऱ्यांचे स्वातंत्र्य कार्य, यांबद्दल भाषणे देतात. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. सर्व विद्यार्थी अभिमानाने भारावून जातात.
स्वातंत्र्यानंतर ज्यांनी भारतीय समाज घडवण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रपुरुषांच्या देखील स्मृती उजागर केल्या जातात. तसेच समाजसेवक, सुधारक, नेते मंडळी, क्रीडापटू आणि कलाकार यांचा सत्कार केला जातो.
स्वातंत्र्यदिनी सर्वांच्या मनात देशाप्रती प्रेम आणि भक्ती जागवण्याचा प्रयत्न केला जातो. सद्यस्थितीत ज्यांनी देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावला, त्यांना मानवंदना दिली जाते. काही ठिकाणी प्रत्येक विभागातील सैनिक, पोलिस व सुरक्षा रक्षक यांचादेखील सत्कार केला जातो.
स्वातंत्र्यदिन हा सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरतो. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला लहान मुलांना खाऊ वाटप केले जाते. देशभक्तीपर संगीत, कला, क्रीडा आणि लष्कर कवायत प्रकार आयोजित केले जातात. सायंकाळी भारतीय तिरंगा उतरवला जातो आणि स्वांतत्र्यदिनाची सांगता केली जाते.
भारताची राजधानी दिल्ली येथे लष्कर संचालन आणि प्रत्येक राज्यनिहाय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. भारतीय प्रधानमंत्री ध्वजारोहण करतात. सर्व आदरणीय लोक आणि मान्यवर नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात.
तुम्हाला स्वातंत्र्यदिन हा मराठी निबंध (Independence Day Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा…