प्रस्तुत लेख हा IFSC code बद्दल मराठी माहिती (IFSC Code Information in Marathi) आहे. या लेखात आयएफएससी कोडविषयी माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आयएफएससी कोड म्हणजे काय? IFSC Code Marathi Mahiti |
आज जीवनातील सर्व वस्तू आणि सेवा ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. आपण देखील नेहमी ऑनलाईन व्यवहार करत असतो. त्यामध्ये बँकिंग सुविधांचा लाभ ऑनलाईन घेणे सुद्धा शक्य झालेले आहे.
असे बँकिंग क्षेत्रातील व्यवहार जे ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष असतील तेथे आपल्याला आयएफएससी कोड माहीत असणे आवश्यक असते. आपण बँकेचे पासबुक जर व्यवस्थित पाहिले असेल तर त्यावर आपला खाते क्रमांक आणि बँकेचा आयएफएससी कोड छापलेला असतो.
तो एक प्रकारे बँकेचा पत्ता असलेला कोड आहे. म्हणजेच बँकेचे इतर व्यवहार आणि पैसे ट्रान्स्फर करताना बँकेचा खाते क्रमांक आणि IFSC कोड यांची आवश्यकता असतेच.
आयएफएससी कोडचा अर्थ – IFSC Code Meaning in Marathi |
IFSC – Indian Financial System Code
IFSC कोडचे विस्तृत रूप भारतीय वित्तीय प्रणाली कोड (इंडियन फायनांशियल सिस्टिम कोड) असे आहे. संपूर्ण भारतात खूप बँका आहेत. त्यांच्या शाखा देखील भरपूर असल्याने प्रत्येक बँकेचा एक विशिष्ट आयडी कोड म्हणून IFSC Code कडे पाहिले जाते.
IFSC कोड मध्ये एकूण 11 वर्ण असतात. सुरुवातीचे चार वर्ण हे इंग्रजी अक्षरे असतात जी अक्षरे बँकेचे नाव (संक्षिप्त) दर्शवतात. पाचवा वर्ण हा नेहमी शून्य असतो. तर शेवटचे सहा वर्ण आहेत ते शाखेचा कोड दर्शवतात ज्याद्वारे प्रत्येक शाखेची एक स्वतंत्र ओळख असते.
तुम्हाला IFSC कोड – मराठी माहिती (IFSC Code Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…