प्रधानमंत्री मुद्रा योजना – मराठी माहिती | PMMY Information in Marathi

प्रस्तुत लेख हा प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल मराठी माहिती (PMMY Mudra Loan Information in Marathi) देणारा लेख आहे. या लेखात मुद्रा योजेनेचे फायदे, पात्रता आणि मुद्रा कर्ज देणाऱ्या बँका या बाबींची माहिती देण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे काय – What is Mudra Yojana in Marathi

भारतात उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्मिती होण्यासाठी केंद्र सरकारकडून लघु आणि मध्यम प्रकारच्या उद्योगांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत कर्ज दिले जाते.

मुद्रा कर्ज देताना व्यवसायाचा प्रकार आणि त्याची भविष्यातील संधी पाहिली जाते. कमीत कमी पन्नास हजार ते १० लाख रुपये पर्यंत या कर्जाचा लाभ होऊ शकतो. मुद्रा योजनेचे विस्तृत नाव मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी असे आहे.

Mudra – Micro Units Development Refinance Agency

मुद्रा कर्ज योजना भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे चालवली जाते. ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये लघु आणि मध्यम प्रकारच्या व्यवसायांच्या विस्तारासाठी किंवा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उद्देश –

• जास्तीत जास्त स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.

• ज्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी जास्त रक्कमेची गरज असेल त्यांना ते कर्जस्वरुपात उपलब्ध करून देणे.

मुद्रा योजनेचे फायदे – Benefits of Mudra Yojana in Marathi

मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी फार कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. म्हणजेच कर्जासाठी आवश्यक असलेली पात्रता अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे.

व्यावसायिक स्वतःचा व्यवसाय वाढवू शकतात.

व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या नवीन व्यावसायिकांना कर्ज मिळाल्याने ते स्वतःच्या कौशल्यात वाढ करून स्वयंरोजगार निर्मिती करू शकतात.

कोणतेही तारण न ठेवता नवीन अथवा जुन्या व्यावसायिकांना 50 हजार ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जमंजुरी झाल्यानंतर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागत नाही.

मुद्रा कर्ज योजनेची पात्रता –

लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

व्यवसाय सुरू करायचा आहे की अगोदरचा व्यवसाय वाढवायचा आहे, हे नमूद असणे आवश्यक आहे.

तुमचा व्यवसाय शेती संबंधित नसावा.

व्यवसायासाठी मिळणारी रक्कम 10 लाख रुपये पर्यंत आहे.

कर्ज लाभार्थी ही कॉर्पोरेट संस्था नसली पाहिजे.

मुद्रा योजनेसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील सर्व उद्योग पात्र ठरतात.

मुद्रा योजने अंतर्गत मिळालेली रक्कम ही
व्यावसायिक गरजांसाठीच वापरावी लागेल.

मुद्रा कर्ज देणाऱ्या बँका –

ICICI बँक
बँक ऑफ महाराष्ट्र
स्टेट बँक ऑफ इंडिया
कोटक महिंद्रा बँक
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा
आय डी बी आय बँक
एचडीएफसी बँक
कॉर्पोरेशन बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
j&k बँक
पंजाब आणि सिंध बँक
आंध्र बँक
देना बँक
सिंडिकेट बँक
पंजाब नॅशनल बँक
तमिळनाडू मर्सेटाइल बँक
ऍक्सिस बँक
कॅनरा बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
फेडरल बँक
कर्नाटक बँक
भारतीय बँक
अलाहाबाद बँक
सारस्वत बँक
UCO बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया

तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल मराठी माहिती (PMMY Mudra Loan Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment