फलंदाजांच्या यादीत जो रूट अव्वल स्थानावर आणि गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन तर अष्टपैलू खेळाडूंत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर विराजमान…
Table of Contents
जो रूटने पटकावले अव्वल स्थान –
ऍशेस मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी जो रूटची कामगिरी उत्तम झाली. त्या कामगिरीचा त्याला फायदा झालेला असून कसोटी फलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल स्थान मिळवलेले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबुशेनला मागे टाकले आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथला मात्र नुकसान झालेले आहे. डब्ल्यूटीसी आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला लबुशेन पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
स्टीव्ह स्मिथ याअगोदर दुसऱ्या स्थानावर होता. त्याची घसरण सहाव्या स्थानावर झालेली आहे. तर उस्मान ख्वाजाने कामगिरी उंचावल्याबद्दल त्याला सातवे स्थान प्राप्त झालेले आहे. किवी कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
भारतीय खेळाडूंपैकी या यादीत फक्त एकच फलंदाज आहे. अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असतानाही ऋषभ पंत दहाव्या क्रमांकावर आहे. अतिउत्तम कामगिरीच्या अभावामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या यादीतून बाहेर पडलेले आहेत.
आयसीसी कसोटी फलंदाजांची क्रमवारी – ICC Test Batsmen Rankings –
1. जो रूट – 887
2. विल्यमसन – 883
3. लबुशेन – 877
4. ट्रॅव्हिस हेड – 873
5. बाबर – 862
6. स्मिथ – 861
7. ख्वाजा – 836
8. डॅरेल मिशेल – 792
9. करुणारत्ने – 780
10. ऋषभ पंत – 758
भारतीय तडका –
मागील दोन वर्षात रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांची कामगिरी अत्यंत समाधानकारक असल्याने त्यांना कसोटी क्रमवारीत त्याचा फायदा झालेला आहे. गोलंदाजांच्या यादीत आर. आश्विन तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानी विराजमान आहेत.
गोलंदाजांत रविचंद्रन आश्विन लई भारी –
संपूर्ण विश्वभर आपल्या गोलंदाजीने प्रभावित करत रवी आश्विन अव्वल स्थानी आहे. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने मातब्बर समजल्या जाणाऱ्या फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलेले आहे.
इंग्लंडच्या जिमी अँडरसनने दुसरे स्थान पटकावले तर दक्षिण आफ्रिकन गोलंदाज रबाडा हा तिसऱ्या स्थानावर आहे. अनेक दिवस क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आठव्या स्थानावर घसरला आहे.
आयसीसी कसोटी गोलंदाजांची क्रमवारी – ICC Test bowler Rankings –
1. रविचंद्रन आश्विन – 860
2. अँडरसन – 829
3. कागिसो रबाडा – 825
4. पैट कमिन्स – 824
5. ओली रॉबिन्सन – 802
6. नॅथन लायन – 799
7. शाहीन आफ्रिदी – 787
8. जसप्रीत बुमराह – 772
9. रवींद्र जडेजा – 765
10. स्टुअर्ट ब्रॉड – 765
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा प्रथम
रवींद्र जडेजा हा भारतीय कसोटी क्रिकेटसाठी वरदान ठरलेला आहे. भारतात तसेच भारताबाहेर खेळल्या गेलेल्या सामन्यांत जडेजाची कामगिरी ही प्रशंसनीय ठरलेली आहे. आपल्या गोलंदाजी व फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या जडेजाने अनेक कसोटी सामने जिंकण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे.
आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडू क्रमवारी – ICC Test Cricket All – Rounder Rankings –
1. रवींद्र जडेजा – 434
2. रविचंद्रन आश्विन – 352
3. शकीब अल हसन – 332
4. अक्षर पटेल – 310
5. बेन स्टोक्स – 309
6. जेसन होल्डर – 283
7. कायले मेयर्स – 250
8. जो रूट – 244
9. मिचेल स्टार्क – 239
10. पैट कमिन्स – 238