भारतीय संघाची निवड _ उनाडकट १० वर्षानंतर खेळणार _

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. निवड समितीने कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे.

आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांत चांगली कामगिरी बजावणाऱ्या मुकेश कुमारला संधी मिळालेली आहे तर संजू सैमसनला निवडले गेल्याने भारतीय फलंदाजीत अनुभवाची भर पडलेली आहे.

जयदेव उनाडकटला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघात संधी मिळाली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यात उनाडकटला खेळवण्याची दाट शक्यता दिसते आहे. उनाडकटने 2013 मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

उनाडकटला यावर्षी खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी मिळाली होती, पण त्याला प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात 4 वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये मोहम्मद सिराज, उमरान मलिक, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. फिरकी गोलंदाजी चांगलीच मजबूत असल्याचे चित्र आहे. चहल, कुलदीप, अक्षर, जडेजा असे चार फिरकी गोलंदाजीचे पर्याय भारताकडे आहेत.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Leave a Comment