हुंडा एक सामाजिक समस्या – मराठी निबंध | Hunda Ek Samajik Samasya Nibandh

प्रस्तुत लेख हा हुंडा एक सामाजिक समस्या (Hunda Ek Samajik Samasya Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. हुंडा प्रथेमुळे होणारे वैयक्तिक नुकसान व कुचंबना, सामाजिक व कौटुंबिक कलह अशा विविध प्रकारच्या बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

हुंडा एक अनिष्ट प्रथा निबंध / हुंडा एक सामाजिक समस्या | Essay On Dowry In Marathi |

व्यक्तिगत गरजा पूर्ण करणे आणि नाते संबंधांतून सामाजिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी विवाह पद्धती समाजात रूढ झालेली दिसून येते. अशा पवित्र विवाहावेळी हुंड्याची मागणी होत असल्याने स्त्री – पुरुष यांच्यातील सहज संबंध विकसित न होता हुंडा प्रथा ही एक कौटुंबिक व सामाजिक समस्या बनलेली आहे.

हुंडा देणे व हुंडा स्वीकारणे हे पूर्वी कौटुंबिक मर्जीनुसार होत असे. परंतु हळूहळू त्यामध्ये विकृती जाणवू लागली. हुंडा देणे ही प्रतिष्ठेची बाब समजू जाऊ लागली. हुंडा प्राप्त न झाल्यास समाजात अपमानाची जाणीव जोपासू लागली. अशा विकृत मानसिकतेमुळे हुंडाबळी देखील जाऊ लागला.

हुंडा न दिलेल्या गरीब घरातील स्त्रियांचा सासरी नांदायला आल्यावर छळ करणे, त्यांचा वारंवार अपमान करणे, शारिरीक व मानसिक त्रास देणे अशी कृत्ये पुरुषी वर्चस्व असलेल्या घरातून होत असत. पूर्वी स्वमर्जीने दिला जाणारा हुंडा ही फक्त एक सोज्वळ जाणीव न राहता ती एक अनिष्ट प्रथा बनत गेली.

हुंडा म्हणजेच आपुलकीने व आदराने दिली गेलेली भेटवस्तू! हुंड्याचे स्वरूप हे वस्त्र, दागिने, पैसे, वस्तू असे असायचे. कौटुंबिक ऐपत, प्रतिष्ठा, व नातेसंबंध अशा खूप साऱ्या गोष्टी हुंड्यात सामील असतात. त्यामुळे हुंडा मिळणे व हुंडा देणे ही विवाहातील अत्यावश्यक बाब मानली जाते.

मानवी नातेसंबंधांची गरज न ओळखता आपण फक्त प्रतिष्ठा जपत असल्याने हुंडा हा समाजात अनिवार्य मानला जाऊ लागला. समाजातील प्रत्येक प्रकारचे कुटुंब हुंडा देऊ लागले व स्वीकारू लागले. त्यामुळे हुंडा ही आपुलकीची गोष्ट राहिली नाही तर गरजच बनून गेली.

जसजसा काळ बदलला तसतसे सामाजिक बदल घडत गेले. पूर्वीची हुंडा पद्धत ही आता सामाजिक व कौटुंबिक जाच बनून राहिली आहे. हुंडा जर दिला नाही तर सासरी गेल्यावर थोरामोठ्यांकडून स्त्रियांनी अपमान व जाच सहन करणे, स्वतःचे प्राण गमवावे लागणे असे कलंक हुंडा प्रथेला लागलेले आहेत.

मागील शतकातील अनेक समाजसुधारकांनी हुंडा प्रथेला विरोध केलेला दिसून येतो. विवाह हा दोन व्यक्तींमध्ये होत असतो परंतु त्यामध्ये कुटुंबातील लोक संबंधित असल्याने हुंडा प्रथेत बहुतेकदा संघर्ष दिसून येतो. हुंडा प्रथेमध्ये अनेक सामाजिक त्रुटी आहेत, त्यामध्ये काळानुसार बदल घडून येत आहे.

आजकाल हुंडाबळी गेला असल्याचे ऐकण्यात येत नाही. तसेच हुंडा ही प्रथा हळूहळू लोप देखील पावत आहे. त्याऐवजी दोन्ही कुटुंबांकडून विवाहात एकसमान खर्च करणे, विवाहित स्त्री पुरुषांना दोन्ही बाजूच्या कुटुंबात एकसमान वागणूक मिळणे अशा गोष्टी समोर येत असल्याने व्यक्तिगत स्तरावर ती जमेची बाजू आहे.

आजकाल जर कोणते कुटुंब हुंडा मागत असेल किंवा देत असेल तर ते आपुलकीपोटी असू शकते. कायदे व्यवस्था व सुरक्षा यंत्रणा मजबूत झाल्याने हुंड्यावरून कोणी अत्याचार करण्याचा आज विचारदेखील करू शकत नाही. तरीही एखादा समाज जर हुंड्याला पाठिंबा दर्शवत असेल तर ती नक्कीच एक सामाजिक समस्या आहे.

तुम्हाला हुंडा एक सामाजिक समस्या हा मराठी निबंध (Hunda Ek Samajik Samasya Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment