प्रस्तुत लेख हा हुंडा एक सामाजिक समस्या (Hunda Ek Samajik Samasya 10 Lines Essay In Marathi) या विषयावर आधारित १० ओळींचा एक मराठी निबंध आहे.
हुंडा देणे व स्वीकारणे या प्रथेमुळे मानवी वैवाहिक जीवन कसे काय कलंकित होत गेले आणि त्यानंतर ती कशी काय सामाजिक समस्या बनली अशा बाबींचे स्पष्टीकरण या निबंधात केलेले आहे.
हुंडा एक सामाजिक समस्या – १० ओळी निबंध मराठी | Dowry 10 Lines Essay In Marathi |
१. हुंडाबळी, अमानुष छळ, मानसिक हिंसा अशा कारणांमुळे हुंडा प्रथा ही एक सामाजिक समस्या बनलेली आहे.
२. विवाहावेळी हुंड्याची मागणी होत असल्याने विवाहित स्त्री – पुरुष यांमध्ये सहज संबंध विकसित होत नाही.
३. पूर्वी स्वमर्जी आणि आपुलकीने दिला जाणारा हुंडा ही फक्त एक सोज्वळ जाणीव न राहता ती आता एक अनिष्ट प्रथा बनलेली आहे.
४. कौटुंबिक इभ्रत, प्रतिष्ठा, व नातेसंबंध अशा खूप साऱ्या गोष्टी हुंड्यात सामील असतात.
५. विवाहात हुंडा मिळणे व हुंडा देणे ही अत्यावश्यक बाब मानली जाऊ लागली आणि हळूहळू त्यामध्ये विकृती जाणवू लागली.
६. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आदर न जपता फक्त हुंडा या एका कारणावरून स्त्रीचा सासरी वारंवार अपमान होत असतो.
७. विवाह हा दोन व्यक्तींमध्ये होत असतो परंतु त्यामध्ये कुटुंबातील लोक संबंधित असल्याने हुंडा प्रथेत बहुतेकदा संघर्ष दिसून येतो.
८. हुंडा जर दिला नाही तर सासरी गेल्यावर थोरामोठ्यांकडून स्त्रियांनी आजपर्यंत अपमान व जाच सहन केलेला आहे.
९. हुंडाबळी म्हणजेच स्वतःचे प्राण गमवावे लागणे असा एक मोठा कलंक हुंडा प्रथेला लागलेला आहे.
१०. आजची स्थिती बदललेली असली तरी एखादा समाज जर हुंड्याला पाठिंबा दर्शवत असेल तर ती नक्कीच एक सामाजिक समस्या आहे.
तुम्हाला हुंडा एक सामाजिक समस्या हा १० ओळींचा मराठी निबंध (Hunda Ek Samajik Samasya 10 Oli Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…