घटस्थापना २०२२ – मराठी माहिती | Ghatasthapana Mahiti Marathi |

प्रस्तुत लेख हा घटस्थापना (Ghata Sthapana) या विषयावर आधारित मराठी माहिती आहे. घटस्थापना कशी केली जाते आणि घटस्थापनेची पूजा अशा विविध बाबींचे वर्णन या लेखात करण्यात आलेले आहे.

घटस्थापना म्हणजे काय? Ghatasthapana Information In Marathi |

26 सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव सणाला पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. संपूर्ण देशभरात दुर्गादेवीची पूजा केली जाते.

आदिशक्ती देवीची विविध रूपांत मनोभावे सेवा केली जाते. देवीची नऊ दिवस स्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो.

घटस्थापना कशी करावी?

घटस्थापना करण्यासाठी माती अथवा पितळेचा तांब्या घ्यावा. पूजेसाठी व स्थापनेसाठी पुढील बाबी जमा कराव्यात – तीळ, जव, मध, सप्तमृतिका, सर्वोषधी, लाल कापड, कुंकू, नारळ, सुपारी, जल, आंब्याचे डहाळे, विड्याचे पान, नाणी इत्यादी.

घटस्थापनेचा मंत्र –

‘ॐ अपवित्रः पवित्रोवा सर्वावस्थां गतोऽपिवा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥’

वरील मंत्राचा उच्चार करून कलशातील पाणी स्वतःवर आणि पूजा साहित्यावर थेंब थेंब वहावे.

उजव्या हातात पूजा साहित्य जसे की फूल, जल, विडा, नाणी आणि सुपारी घेऊन देवीच्या पूजनाचा आरंभ करावा.

नवरात्र घटस्थापना पूजा विधी –

• दुर्गा देवीची मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी. मातीत जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू, बाजरी अशी सप्तधान्ये ठेवावी आणि त्यामध्ये सप्तमृतिका मिसळावे.

• मातीवर कलश ठेवावा. फुले, अक्षता, व जल वाहून देवीचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे.

• आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशावर एक पात्र ठेवावे. त्या पात्रात धान्य भरावे. त्यावर एक दीप ठेवावा. कलशाला लाल रंगाचे कापड गुंडाळावे.

• शेवटी पूजा घरातील सर्व देवांना नमस्कार करावा. देवीची पूजा करून दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.

*टीप – पूजाविधी व धार्मिक संकल्पना या माहिती स्वरूपात प्रस्तुत लेखात मांडलेल्या आहेत. येथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा खोटी माहिती पसरवण्याचा हेतू नाही.

तुम्हाला घटस्थापना – मराठी माहिती (Ghatasthapana Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment