रुग्णालय आपल्याला सर्वांना परिचित आहे. रुग्णांचा आजार ओळखणे, त्यांना उपचार देणे अशा प्रकारच्या सेवा रुग्णालयात दिल्या जातात. रुग्णालयाबद्दल सर्व प्रकारची माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना रुग्णालय मराठी निबंध (Hospital Essay In Marathi) लिहावा लागतो.
रुग्णालय/दवाखाना मराठी निबंध | Hospital Marathi Nibandh |
प्रत्येकजण आजारी पडल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर रुग्णालयात जात असतो. तेथे जाऊन उपचार घेत असतो. सद्यस्थितीत वेगवेगळ्या आजारांसाठी सर्व सुविधायुक्त अशी रुग्णालये निर्मित झालेली आहेत. रुग्णालय ही फक्त एक वास्तू नाही तर रुग्णांसाठी आशास्थान आहे.
रुग्णालयासाठी दवाखाना असा आणखी एक शब्द प्रचलित आहे. लहानपणापासून आपण जेव्हा जेव्हा आजारी पडलेलो आहोत तेव्हा आपल्याला सर्वप्रथम रुग्णालय आणि डॉक्टरची आठवण होते. आधुनिक जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे माणूस सारखाच आजारी पडत आहे त्यामुळे रुग्णालय ही आता काळाची गरजच झालेली आहे.
रुग्णालये ही विविध प्रकारची असतात. आज तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असल्याने त्यापद्धतीची मल्टी स्पेशालिटी रुग्णालये किंवा स्पेशालिटी क्लिनिक निर्मित झालेली आहेत. दात, डोळे, हाडे, त्वचा, बालरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, अशा विविध प्रकारच्या समस्यांसाठी त्या त्या प्रकारची रुग्णालये आहेत.
मोठी रुग्णालये निर्मित करताना सहाय्यक निधी आणि सरकारी मदत आवश्यक असते. तेथे डॉक्टर्स आणि नर्सची टीम कार्यरत करावी लागते. इतर सर्व सुरक्षित सुविधा, स्वच्छ खोल्या, रुग्णवाहिका यांचा समावेश करावा लागतो. रुग्णालयाशेजारी झाडे आणि बगीचा असेल तर उत्तमच! कारण रुग्णांसाठी एक आल्हाददायक वातावरण निर्माण होत असते.
सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालये अशा दोन प्रकारची रुग्णालये आपल्याला पाहायला मिळतात. सरकारी रुग्णालयात मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार दिले जातात. तेथे संपूर्ण सुविधा असतात. योग्य ती काळजी देखील घेतली जाते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना सरकारी रुग्णालयात उपचार घेणे परवडते. याउलट ज्या लोकांना असे वाटते की रुग्ण नातेवाईकाला अत्यंत सुविधापूर्ण वातावरणात उपचार मिळावेत, ते लोक रुग्णाला खासगी रुग्णालयात घेऊन जातात.
रुग्णालयात विविध विभाग असतात. डॉक्टर्सची कॅबिन, रुग्ण विभाग, तज्ञ उपचार विभाग, ऑपरेशन थिएटर, मेडिसिन कक्ष, वेटींग रूम, अशा अनेक कक्षांचा समावेश रुग्णालयात असतो. रुग्णालयामध्ये प्रत्येक विभागात काम करणारे तज्ञ लोक कार्यरत असतात.
सद्यस्थितीत रुग्णालयाचे महत्त्व अपार आहे. आज वाढलेले अपघात आणि साथीचे रोग, जुन्या रुग्णांची नियमित तपासणी तसेच वृद्ध लोक, स्त्री आणि बाल रोग चिकित्सा अशा सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी रुग्णालये आवश्यक आहेतच.
रुग्ण लोक आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालये आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जेथे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानली जाते, अशा रुग्णालयात वातावरण तेवढे प्रसन्न नसते पण रुग्णाचे शारिरीक दुःख दूर करण्याचे काम मात्र रुग्णालयात होत असते.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला रुग्णालय मराठी निबंध (Hospital Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…