प्रस्तुत लेख हा हिमालय पर्वत – मराठी निबंध (Himalaya Essay In Marathi) आहे. या निबंधात हिमालय पर्वताचे भौगोलिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या असलेले महत्त्व सांगायचे असते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!
हिमालय निबंध मराठी | Himalaya Marathi Nibandh
जगातील सर्वात उंच पर्वतरांग म्हणून हिमालय पर्वतरांगेची ओळख आहे. हिमालय पर्वतरांग ही सुमारे २४०० कि. मी. लांब आहे आणि ती भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, म्यानमार आणि भूतान या देशांमधून जाते. भारतीय उपखंड हा हिमालय पर्वतामुळे अत्यंत सुरक्षित मानला जातो.
हिमालय शब्दाचा अर्थ म्हणजे हिम (बर्फ) जेथे वास करते असे स्थान. हिमालय पर्वत हा भारतीय उपखंडातील वातावरण नियंत्रित करतो. त्यामुळे भारतातील हवामान हे निश्चित गती आणि काळ राखून आहे. हिमालय पर्वतांमुळे उत्तरेकडील थंड वारे अडवले जाते. त्यामुळे भारतीय उपखंडातील हवामान सदा उबदार राहण्यास मदत होते.
जगभरातील विविध संस्कृती आणि मानवजाती भौगोलिक बदलामुळे निर्मित होतात आणि नष्टही होतात परंतु भारतीय उपखंड मात्र हिमालय पर्वतांमुळे सर्वात प्राचीन संस्कृती असलेला भूभाग आहे. नैसर्गिक हवामान हे अत्यंत पोषक असल्याने येथील साधन संपत्ती जोपासण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत.
भारतीय उपखंडात असलेल्या सर्व देशांतील बहुतांश महत्त्वाच्या नद्या हिमालयातून उगम पावतात. त्याच नद्या पुढे संपूर्ण मानवी व इतर सजीव जीवनाचे पोषण करतात. गंगा, ब्रह्मपुत्रा, यांग्त्सी आणि सिंधू या नद्यांचे उगमस्थान हिमालयात आहे. या नद्यांप्रमाणेच हिमनद्या सुद्धा हिमालयात उगम पावतात.
हिमालय पर्वताचा उल्लेख अत्यंत प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. वेद – पुराण आणि धार्मिक ग्रंथांत हिमालयाचे वर्णन केलेले आहे. हिमालय पर्वतरांगेत असलेल्या कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती निवास करतात, असे मानले जाते. त्यामुळे अध्यात्मिक उन्नतीत हिमालयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
अध्यात्मिक क्षेत्रात तपश्चर्या आणि साधनेसाठी हिमालय हे सर्वोत्तम ठिकाण असल्याचे मानले जाते. मानस सरोवर आणि ओम पर्वत ही ठिकाणे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली गेली आहेत. हिमालयात अमरनाथ, ऋषिकेश, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे देखील आहेत.
हिमालय पर्वत हा प्रामुख्याने ब्रूहद हिमालय, मध्य हिमालय, पॅरा (ट्रान्स) हिमालय आणि शिवालिक अशा चार प्रमुख पर्वतीय क्षेत्रांत विभागला गेलेला आहे. हिमालय पर्वत गिर्यारोहणासाठी अत्यंत उत्कृष्ट मानला जातो. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर देखील हिमालयात आहे.
सकाळी सूर्यप्रकाश पडला की हिमालयाचे सुंदर रूप बघण्यासारखे असते. संपूर्ण हिमालय गंधसरूच्या झाडांनी भरलेला आहे. हिमालयात हत्ती, अस्वल, चित्ता आणि रेनडियर यांसारखे प्राणी वास्तव्य करतात. कित्येक कवी, कथाकार, चित्रकार आणि संगीतकार यांनी हिमालयाचे अत्यंत सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे.
तुम्हाला हिमालय पर्वत हा मराठी निबंध (Himalaya Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…