गुडफ्रायडे – मराठी निबंध | Good Friday Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा गुडफ्रायडे (Good Friday Essay In Marathi) या दिनावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात गुडफ्रायडे दिनाचे महत्त्व आणि तो कसा साजरा केला जातो याविषयी माहिती देण्यात आलेली आहे.

गुडफ्रायडे निबंध मराठी | Good Friday Nibandh Marathi

ख्रिश्चन धर्मात गुडफ्रायडे हा दिवस अत्यंत पवित्र समजला जातो. गुडफ्रायडे या दिवशी ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात, भगवान येशूंच स्मरण करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. गुडफ्रायडे या दिवशी ख्रिस्ती धर्मात सामाजिक कार्य करण्याची देखील प्रथा आहे.

धर्म परंपरेनुसार जे दिवस आपण साजरे करतो त्यांना धार्मिक अथवा सांस्कृतिक महत्त्व असतेच. त्याचप्रमाणे प्रभू येशुंनी ज्या दिवशी समाधानाने मरण स्वीकारले आणि त्यामुळे प्रेमपूर्ण जीवनाचा संदेश संपूर्ण जगभरात पसरला गेला तो दिवस शुक्रवार होता.

प्रभू येशू ख्रिस्त हे जरी वेदनात्मक पद्धतीने वधस्तंभावर खिळवण्यात आले असले तरी त्यांच्यासाठी आलेल्या वेदना आणि मरण हे त्यांनी अत्यंत प्रेमभावाने स्वीकारले. त्यांनी स्वतः च्या मारेकऱ्यांसाठी देखील “ईश्वरा यांना माफ कर, ते जाणत नाहीत की ते काय करत आहेत” अशी प्रार्थना केली.

मरणयातना भोगत असताना देखील ईश्र्वराजवळ अशी प्रेमपूर्ण प्रार्थना करणारे प्रभू येशू ख्रिस्त हे किती महान व्यक्तित्व होते हे आपणांस कळून येते. त्यामुळे त्यांचे मरण हे मानवी इतिहासात अजरामर झालेले आहे. त्यांच्या मृत्यूचा विधायक प्रभाव संपूर्ण जगभरात आजही दिसून येतो.

प्रभू येशू ख्रिस्त हे दया, करुणा आणि प्रेम या गुणांचे मूर्तिमंत रूप होते. त्यामुळेच ते स्वतःवर अन्याय करणाऱ्या लोकांना माफ करू शकले. येशू ख्रिस्त हे परम ईश्वराचे पुत्र असल्याने त्यांचा मृत्यू हा एका विधायक भावनेने विश्र्वभरात ओळखला जावा यासाठी शुक्रवार दिनाला “गुड फ्रायडे” किंवा “होली डे” असे संबोधले जाते.

काही ठिकाणी या दिनाला “ब्लॅक डे” असेही संबोधतात. येशू ख्रिस्त हे ईश्वराचे पुत्र असूनही त्यांचा मृत्यू एवढा वेदनादायक झाल्याने बहुतांश लोक या दिवसाला “ब्लॅक डे” म्हणजे “काळा दिवस” मानतात. मानवाने ईश्वराच्या पुत्राशी केलेला व्यवहार हा कधीच वंदनीय नसेल, त्यानिमित्ताने “काळा दिवस” स्मरण केला जातो.

गुडफ्रायडे या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यांची शिकवण वाचली जाते. त्यांची वचने अंगिकारण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली जाते. अशाप्रकारे गुड फ्रायडे हा दिवस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जीवनातील शेवटचा दिवस असल्याने तो पवित्र आणि पूजनीय मानला जातो.

तुम्हाला गुडफ्रायडे हा मराठी निबंध (Good Friday Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment