फुलांना बोलता आले असते तर त्यांनी स्वतःचे मनोगत किंवा आत्मकथा कशी मांडली असती. त्याचेच वर्णन करणारा फुलाची आत्मकथा हा निबंध (Fulachi Atmkatha Essay in Marathi) प्रस्तुत लेखात देण्यात आलेला आहे.
फुलाची आत्मकथा / फुलाचे मनोगत | Fulachi Atmkatha Marathi Nibandh |
मनुष्याच्या दैनंदिन जीवनात फुलांचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे. फुलांचा फक्त उपयोग केला जातो परंतु त्यानंतर कोमेजलेल्या अवस्थेत कोणी ढुंकून सुद्धा पाहत नाही. माझ्याबरोबर घडलेल्या प्रसंगांचे वर्णन म्हणजेच माझी आत्मकथाच मला तुम्हाला सांगायची आहे.
मला सर्वजण गुलाब म्हणून ओळखतात. माझा रंग गुलाबी आहे. परंतु सध्या लाल, पांढरा, केशरी, पिवळा अशाही रंगांचे गुलाब अस्तित्वात आहेत. अनेकांचे गुलाब हे आवडते फूल असते पण ज्यांना ते आवडते तेच मला तोडतात आणि माझा वापर करतात.
मी जेव्हा कळी होतो तेव्हा माझी खूप स्वप्नं होती. मी उमलावे, सुगंधित व्हावे आणि वाऱ्यासोबत इकडे तिकडे डोलावे! त्यानंतर दोन ते तीन दिवसात पूर्णपणे जीवनाचा आनंद घेऊन मिटून जावे. जवळजवळ प्रत्येक गुलाबाचे असेच स्वप्न असते.
मनुष्य मात्र हे स्वप्न पूर्ण होऊन देत नाही. मी कळीतून फूल म्हणून विकसित होत होतो. मला असंख्य किरणांची अनुभूती होत होती. माझा विकास पूर्णत्वास जात होता. माझ्या कायेला सुगंध प्राप्ती होत होती. एके दिवशी पहाटे पहाटे मी पूर्ण बहरात आलो आणि एकदाचा उमललो.
तो दिवस माझ्यासाठी खूपच सुंदर व्यतित होत होता. परंतु ते सुख काही क्षणांचे होते. ज्या घरासमोर मी उमललो होतो त्या घरातील स्त्री आली आणि मला तोडले. माझे प्राण माझ्या झाडापासून वेगळे केले. मी तिच्या केसातील शोभा बनून राहिलो परंतु माझे जीवन मात्र शोभनीय राहिले नाही.
सर्व पूजाविधी तसेच मंगल प्रसंगी माझा वापर केला जातो. मला फुलांचा राजा म्हणून संबोधले जाते. ते माझ्यात असलेल्या गुणांमुळेच! मला सुगंध आणि सौंदर्याचे प्रतिक मानले जात असल्याने मनुष्य माझे अस्तित्व सतत त्याच्या घराच्या अंगणात जपत असतो.
मनुष्य पूर्वीपासून माझ्या कायेचा उपयोग करीत आलेला आहे. सुगंधी अगरबत्ती, अत्तर, गुलाबजल, गुलकंद तसेच साबण बनवण्यासाठी माझा उपयोग होतो. परंतु तो फक्त उपयोग झाला, माझे जीवन आणि माझी सुंदरता मनुष्याने कधीच अनुभवली नाही.
मनुष्य भावनांना शब्दांची कडा असते पण मी तर फूल आहे. माझ्या भावना मी कशा बोलक्या करू? मला मनुष्य फक्त वापरतो परंतु माझे संपूर्ण आयुष्य मला जगू दिलेले नाहीये. माझ्या व्यक्तिगत जीवनाचा कधी विचार झालेला नाहीये. माझा सुगंध आणि माझी काया सर्वत्र विलीन झाली नाहीये.
तुम्हाला फुलाची आत्मकथा हा निबंध (Fulachi Atmkatha Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…