माझा आवडता खेळ फुटबॉल – मराठी निबंध | Maza Avadta Khel Football Nibandh

प्रस्तुत निबंधात माझा आवडता खेळ – फुटबॉल (Maza Avadta Khel Football Marathi Nibandh) या विषयावर विस्तृत वर्णन केलेले आहे. विद्यार्थी दैनंदिन जीवनात कोणता ना कोणता खेळ खेळतच असतात. त्यामधील एखाद्या आवडत्या खेळावर त्यांना शालेय जीवनात निबंध लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

माझा आवडता खेळ – फुटबॉल | Football Essay In Marathi

खेळामुळे आपले मन आणि शरीर तंदुरुस्त बनत असते. रोजच्या जीवनात एकतरी खेळ खेळणे आवश्यक आहेच. मीही क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, बुद्धिबळ, कबड्डी हे खेळ खेळतो परंतु त्यामध्ये माझा सर्वात आवडता खेळ आहे फुटबॉल!

फुटबॉल हा विश्र्वभरात अत्यंत उत्सुकतेने खेळला जातो. फुटबॉल हा व्यक्तीला शारिरीकदृष्ट्या कणखर आणि सक्षम बनवतो. फुटबॉल पायाने टोलवणे आणि गोल पोस्टमध्ये ढकलणे यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतात. त्यातून मानसिक आणि बौद्धिक निर्णय क्षमता देखील हाताळली जाते.

पाश्चिमात्य देश फुटबॉल खेळात निपुण आहेत. विविध क्लब आणि देशांतर्गत स्पर्धा या संपूर्ण फुटबॉल जगतासाठी आकर्षणाचा बिंदू ठरतात. तसेच चार वर्षांतून एकदा फुटबॉल विश्वचषक देखील आयोजित केला जातो. लिओनेल मेस्सी हा माझा आवडता खेळाडू तर अर्जेंटिना हा माझा आवडता फुटबॉल संघ आहे.

आमच्या शाळेतही फुटबॉल खेळला जातो. आमच्या वर्गाचा मी कर्णधार आहे. वार्षिक क्रिडा स्पर्धेत आम्ही नेहमीच उत्तम खेळ करत असतो. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये या वर्षी आमच्या शाळेची टीम पाठवली होती. त्यामध्ये माझे प्रदर्शन समाधानकारक होते.

फुटबॉल खेळात दोन्ही संघात प्रत्येकी ११ खेळाडू असतात. एक गोलरक्षक असतो तर बाकीचे सर्वजण एका रणनीतीनुसार बॉल दुसऱ्या गोलमध्ये पाठवत असतात. दोन्ही संघाचे खेळाडू बचाव आणि आक्रमण करत असतात. जो संघ जास्त गोल मारेल तो संघ विजयी ठरतो.

फुटबॉल हा खेळ आयताकृती मैदानात खेळला जातो. हा खेळ ९० मिनिटांचा असतो ज्यामध्ये ४५ मिनिटानंतर विश्रांती असते. जर सामना ९० मिनिटांच्या खेळात बरोबरीत राहिला तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी अतिरिक्त वेळ देखील दिला जातो.

खेळताना फुटबॉलला हात लागणे हे नियमाविरुद्ध आहे. डोके, शरीर व पाय यांचा वापर करून फुटबॉल टोलवत राहायचे असते. सामन्याचे परीक्षण करायला आणि नियमांतर्गत खेळ होण्यासाठी पंच नेमलेले असतात. ते सर्व निर्णय देत असतात.

मलाही मोठे झाल्यावर फुटबॉलपटू बनायचे आहे. भारतात देखील आता फुटबॉल अकॅडमी आणि फुटबॉल लीग सुरू झालेल्या आहेत. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी देखील फुटबॉल अकॅडमी लावणार आहे.

सध्या मी इंटरनेटवरून खेळाडूंच्या मुलाखती आणि त्यांची कौशल्ये बघत असतो. फुटबॉल जगतातील बातम्या वाचत असतो. मी सध्या दिवसातील दोन तास फुटबॉलचा सराव करतो. या खेळातील तीव्रता, समर्पण आणि चपळता यामुळे फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला माझा आवडता खेळ – फुटबॉल (Maza Avadta Khel Football Marathi Nibandh) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment