जागतिक पर्यावरण दिन – मराठी निबंध | Jagatik Paryavaran Din Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा जागतिक पर्यावरण दिन (Jagatik Paryavaran Din Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात पर्यावरण दिन कधी व कसा साजरा केला जातो हे सांगण्यात आलेले आहे तसेच पर्यावरण दिनाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.

जागतिक पर्यावरण दिन निबंध मराठी | World Environment Day Essay In Marathi |

आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकांत मानवी जीवन व निसर्ग अस्थव्यस्थ झालेले आहेत. हीच समस्या ओळखून जगभर जनजागृती होण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरवले.

पहिल्या महायुद्धानंतर पर्यावरणावर अत्यंत गंभीर परिणाम झाल्याने पर्यावरण विज्ञान व पर्यावरण शास्त्र असे विषय निर्माण झाले. त्यानंतर त्याची माहिती प्रसारित होणे व लोकांना पर्यावरण विषयक जनजागृती होण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ५ जून १९७२ रोजी सर्वसाधारण सभेत पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

दिनांक ५ जून १९७४ रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाचा आणि तेथील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण दिन हा प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

मानवी जीवनशैली आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याने भौतिक सुविधांचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर देखील अमर्यादित होत आहे. त्याचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तींचा सामना मानवाला करावा लागत आहे. याची जाणीव मानवाला पर्यावरण दिनी करून दिली जाते.

पर्यावरण दिनी जागतिक स्तरावरील एखादी नैसर्गिक समस्या अथवा संकल्पना स्पष्ट करून सांगितली जाते. त्यासाठी थीमचा (Theme) उपयोग केला जातो. प्रत्येक वर्षी पर्यावरण दिनासाठी वेगवेगळी थीम आयोजित केली जाते आणि तिचे अनुसरण संपूर्ण वर्षभर जगभरात केले जाते. पर्यावरण दिनाच्या थीम बाबत सर्वजण आतुरलेले असतात.

पर्यावरण दिन हा मागील काही वर्षात सोशल मीडियामुळे खूपच प्रसिध्द झाला आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःचे पर्यावरण विषयक विचार व मत सोशल मीडियावर प्रदर्शित करू शकतो. त्यामुळे सध्या संगणक आणि मोबाईलमुळे पर्यावरण दिन हा ऑनलाइन देखील साजरा होत आहे.

पर्यावरण विषयक समस्या निर्माण होण्याची कारणे शोधून काढणे व त्यावर उपाययोजना अंमलात आणणे यासाठी पर्यावरण दिन खूप महत्त्वाचा ठरतो. त्या दिवशी सद्य परिस्थितीनुसार एखादी पर्यावरण समस्या जगजाहीर केली जाते आणि संपूर्ण जगातील देश त्या समस्येबद्दल उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात.

जगातील देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याने सर्वत्र नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर दिवसेंदिवस वाढला आहे. लोक अशा प्रकारे लोक जीवन जगत आहेत की त्यामुळे पर्यावरण धोक्यात आलेले आहे. ही अत्यंत गंभीर समस्या ओळखून पर्यावरण पूरक आयुष्य आपण जगू शकतो का? याचा विचार नक्कीच या पर्यावरण दिनी होणे गरजेचे आहे.

तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन हा मराठी निबंध (Jagatik Paryavaran Din Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा

Leave a Comment