जागतिक पर्यावरण दिन – मराठी माहिती Paryavaran Din Marathi Mahiti |

प्रस्तुत लेख हा जागतिक पर्यावरण दिनाविषयी मराठी माहिती (Jagatik Paryavaran Din Marathi Mahiti) आहे. या लेखात पर्यावरण दिन कसा साजरा केला जातो, पर्यावरण दिनाचे महत्त्व आणि पर्यावरण दिन साजरा करण्यामागे काय उद्देश्य आहे अशा विविध मुद्द्यांची चर्चा केलेली आहे.

जागतिक पर्यावरण दिन माहिती मराठी | World Environment Day Information In Marathi |

पर्यावरण दिनाचे महत्त्व – Importance of World Environment Day

• आपली पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे.

• जगातील देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहेत त्यामुळे सर्वत्र नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर दिवसेंदिवस वाढला आहे.

• लोक अशा प्रकारे लोक जीवन जगत आहेत की त्यामुळे पर्यावरण धोक्यात आलेले आहे.

• माणूस आणि पर्यावरण यांचे नाते अतूट आहे. निसर्गाशिवाय जीवन शक्य नाही. अशा परिस्थितीत मानवाला निसर्गाशी जुळवून घ्यावेच लागते.

• नैसर्गिक समस्या माहीत असूनही पर्यावरण सतत प्रदूषित होत आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या वाढत आहेत, ज्याचा परिणाम केवळ आपल्या जीवनावर होत नाही, तर अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींनाही सामोरे जावे लागत आहे.

• आनंदी आणि निरोगी जीवनासाठी पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

पर्यावरण दिन कसा साजरा केला जातो?

या दिवशी लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक केले जाते आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. पर्यावरण दिनी सद्य स्थितीत असणारी पर्यावरण विषयक समस्या विचारात घेतली जाते आणि त्या समस्येच्या निराकरणासाठी एक उपक्रम जाहीर केला जातो.

प्रत्येक वर्षी पर्यावरण दिनाची थीम तयार केली जाते आणि वर्षभर त्या सबंधित कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते. सध्या सोशल मीडियाचा वापर करून सर्वत्र पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून देणारे संदेश पाठवले जातात.

जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जून महिन्यात साजरा केला जातो. जगभरातील सर्व देश ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करतात. यंदाही पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण विषयक भवितव्य यांची जाणीव करून देण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.

पर्यावरण दिन साजरा करण्यास कधी सुरुवात झाली?

पर्यावरण दिनाची सुरुवात सर्वप्रथम १९७२ मध्ये झाली. ५ जून १९७२ रोजी या दिवसाची पायाभरणी संयुक्त राष्ट्रांनी केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे ५ जून १९७४ रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

पर्यावरण दिन साजरा करण्यामागे काय उद्देश्य आहे?

जगात प्रदूषण सातत्याने वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गावरील संकट वाढत आहे. तसेच मानवी जीवनशैली अशी बनलेली आहे जी पर्यावरण पूरक नसून पर्यावरणास घातक ठरणारी आहे.

प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी आणि निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवण्याची प्रेरणा मिळावी, असा उद्देश्य निर्माण झाला.

पहिला पर्यावरण दिन कोणत्या देशाने साजरा केला?

संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी, पर्यावरण दिन सर्वप्रथम स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे साजरा करण्यात आला. १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे पहिली पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ११९ देश सहभागी झाले होते.

भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा –

भारत पर्यावरण संरक्षणाबाबतही गंभीर आहे. यासाठी भारताने पर्यावरण रक्षणासाठी कायदा केला आहे. या अंतर्गत १९ नोव्हेंबर १९८६ रोजी पर्यावरण संरक्षण कायदा लागू करण्यात आला.

२०२२ ला पर्यावरण दिनाची थीम काय आहे?

जागतिक पर्यावरण दिन २०२२ ची थीम “केवळ एक पृथ्वी” आहे. या थीमवर आधारित ‘लिव्हिंग इन हार्मोनी विथ नेचर’ यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

पृथ्वी एकच असल्याने आपण आपल्या गरजा न वाढवता निसर्गाशी अनुरूप असा व्यवहार करून एक पर्यावरण पूरक वातावरण पृथ्वीवर निर्माण करणे गरजेचे आहे.

तुम्हाला जागतिक पर्यावरण दिन – मराठी माहिती (Jagatik Paryavaran Din Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment