प्रस्तुत लेख हा सायबर सुरक्षा – मराठी माहिती (Cyber Security Information In Marathi) आहे. सायबर अटॅक आणि सायबर सिक्युरीटी म्हणजे काय, अशा बाबींची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.
Table of Contents
सायबर अटॅक म्हणजे काय? Cyber Attack meaning in Marathi
आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे जग जवळ येत आहे. इंटरनेटद्वारे आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. एवढेच नाही तर जगातील कोणत्याही विषयावर उपलब्ध असलेली माहिती देखील सहज मिळवू शकतो.
जेवढा इंटरनेटचा सदुपयोग केला जातो तेवढाच दुरुपयोगही केला जातो. अलिकडे बँकेतील पैसे चोरीला जाणे, कंपन्या – संघटना यांचे महत्वाचा डेटा चोरून त्याबदल्यात त्यांना धमकी देणे, पैसे मागणे इत्यादी गुन्हे घडलेले आपण सतत ऐकत असतो.
हे गुन्हे नेटवर्कद्वारे केले जातात. त्यांनाच सायबर अटॅक (Cyber Attack) असे म्हटले जाते. सायबर अटॅक ही समस्या सध्या वैयक्तिक राहिलेली नसून आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील समस्या बनलेली आहे. मोठमोठे कलाकार, खेळाडू, नेते हे देखील याला अपवाद नाहीत. त्यांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती चोरून त्याचा गैरवापर केला जात आहे.
अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर केला जाणारा उपाय म्हणजे सायबर सिक्युरिटी. म्हणजेच सायबर अटॅकच्या विरोधात केली जाणारी सुरक्षा म्हणजेच सायबर सुरक्षा (Cyber Security) होय.
सायबर सुरक्षा (सिक्युरिटी) म्हणजे काय | Cyber Security Meaning In Marathi |
इंटरनेट, संगणक, सर्व्हर, मोबाईल, नेटवर्क यांच्यावर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांपासून संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवण्याच्या पद्धतीलाच सायबर सुरक्षा (Cyber security) असे म्हणतात.
सायबर सुरक्षेमुळे आपण आपली माहिती सुरक्षित ठेवू शकतो. आपल्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची खात्री ठेवू शकतो. हे सायबर हल्ले व्हायरस अटॅक, फिशिंग, कोड इंजेक्शन, मालवेअर, एसक्यूएल इंजेक्शन, झिरो डे इत्यादि द्वारे केले जातात. या हल्ल्यांपासुन बचाव करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर विकसित झालेले आहेत.
फायरवॉल हे त्यातीलच एक उत्तम उदाहरण आहे. तसेच नेटवर्क सुरक्षा, ॲप्लिकेशन सुरक्षा, माहिती किंवा डेटा सुरक्षा, ऑपरेशन सुरक्षा, क्लाउड सिक्युरिटी यांद्वारे सायबर सुरक्षा केली जाते.
सायबर अटॅकपासून घ्यावयाची काळजी – Cyber Attack Precautions in Marathi
सायबर अटॅकपासून आपले व आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी खालील गोष्टींचे अनुसरण करणे आवश्यक आहे.
१. सिस्टिम अपडेट करणे –
सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीमला अपडेट केल्याने नवीन व्हर्जन स्थापित केले जाते. नवीन व्हर्जन आपल्या सिस्टीमला सायबर हल्लयांपासून सुरक्षित ठेवतात.
२. अँटी – व्हायरस सॉफ्टवेअर वापरणे –
अँटी – व्हायरस सॉफ्टवेअर सिक्युरिटी गार्ड प्रमाणे काम करते. व्हायरसला सिस्टीममध्ये प्रवेश करण्यास मनाई करते आणि आपल्या सिस्टीमला सुरक्षित ठेवते.
३. पासवर्डचा वापर करणे –
सहसा आपण पासवर्ड बनवताना आपल्याला सहज लक्षात ठेवता येईल असा बनवतो. त्यासाठी आपण आपल्या नावाचा, जन्मतारखेचा, मोबाईल नंबरचा वापर करतो पण पुढे जाऊन हीच चूक आपल्याला महागात पडू शकते.
हॅकर्स आपल्या वैयक्तिक माहितीचा शोध घेऊन पासवर्ड हॅक करतात.आणि आपल्या सिस्टीमवर ताबा मिळवतात. त्यामुळे नेहमी मजबूत पासवर्ड बनवण्यासाठी विशिष्ट चिन्हाचा, अंकांचा, अक्षरांचा, वर्णांचा वापर करावा जेणेकरून हॅकर्सना पासवर्ड हॅक करणे कठीण होते.
तसेच आपला पासवर्ड गोपनीय ठेवावा आणि आपला पासवर्ड दर काही कालावधीनंतर बदलत राहणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी असते.
४. असुरक्षित Wi-Fi नेटवर्कचा वापर करू नये –
सायबर अटॅक हे नेटवर्कद्वारे केले जातात. जर आपण असुरक्षित Wi-Fi नेटवर्कचा वापर केला तर आपण सहज सायबर अटॅकचे शिकार बनू शकतो. त्यामुळे कधीही पब्लिक नेटवर्क वापरताना सावध रहावे.
५. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये –
कधी कधी हॅकर्स लिंकद्वारेही व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये पाठवतात आणि जर अशा लिंकवर क्लिक केले तर ते आपल्या सिस्टीममध्ये सहज प्रवेश करू शकतात. त्यामुळे नेहमी मोबाईल वापरताना सतर्क रहावे.
तुम्हाला सायबर सुरक्षा – मराठी माहिती (Cyber Security In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…