Chicken Biryani Recipe in Marathi |चिकन बिर्याणी कशी बनवावी?

Chicken Biryani खूपच प्रसिध्द असा भाताचा प्रकार आहे. उत्तम प्रकारचे चिकन आणि तांदूळ वापरून तुम्ही मस्तपैकी पार्टीचा बेत करू शकता. बिर्याणी बनवण्यासाठी वेळ लागत असला तरी त्याची चव काही निराळीच असते. एखाद्या सुट्टीच्या दिवशी सर्व लागणारे घटक पदार्थ आणून नक्कीच प्रयत्न करा. Chicken Biryani recipe in Marathi या लेखामध्ये आम्ही तुम्हाला chicken biryani Recipe बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. तर चला तर मग सुरु करूया…

Chicken Biryani Recipe । चिकन बिर्याणी कशी बनवावी?

लागणारा वेळ- एक ते दीड तास               

Chicken Biryani recipe Ingredients | लागणारे साहित्य:

• चिकन – ५०० ग्रॅम

• उत्तम प्रतीचा तांदुळ – २ कप

• हिरव्या मिरच्या २

• १ कांदा चिरून 

• १ टोमॅटो चिरून

• १/२ चमचा गरम मसाला 

• वेलदोडे १

• कोथिंबीर

• मीठ

• लाल तिखट

• ३ चमचे तेल

• २ चमचे आले लसूण पेस्ट

• १ चमचा हळद 

•  १ तमालपत्र

• लवंग २-३

• दालचिनी २ तुकडे

Chicken Biryani Recipe in Marathi Process | कृती

१. तांदुळ धुवून घ्या. 

२. चिकन स्वच्छ धुवून घ्या. चिकनला मीठ, हळद लावून वाफलून घ्यावे.

३. धुतलेले तांदुळ आणि चिकन आता थोडा वेळ बाजूला ठेवावे.

४. टोप किंवा कुकरमध्ये तेल टाकून थोडी हळद, जिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी, आले – लसूण पेस्ट असे सर्व मसाले परतावे. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, चिरलेला टोमॅटो टाकून चांगले २ मिनिटे परतावे.

५. आता कुकरमध्ये चिकन टाकावे. गरम मसाला आणि योग्य प्रमाणात पाणी टाकून थोडा वेळ शिजू द्यावे. 

६. धुतलेले तांदूळ टाकावे. मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. त्यामध्ये गरजेनुसार मीठ घालावे.

७. योग्य प्रमाणात पाणी वापरावे व शिजलेले तांदूळ पहावे.

८. कुकरला २ शिट्ट्या होवू द्याव्यात. नंतर तयार झालेली बिर्याणी मस्तपैकी सर्व्ह करावी.

टीप : 

• बिर्याणीसाठी योग्य प्रमाणात पाणी वापरावे. 

• तांदळाच्या प्रकारानुसार पाणी लागत असल्याने ४ ते ५ कप पाणी लागेल

•तेल थोडेसे जास्त घेतले तरी चालेल.


तर हि चिकन बिर्याणी रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही तुमच्या कमेंट ची वाट पाहतोय.

हे सुद्धा वाचा- Idli recipe in Marathi । भरपूर आस्वाद घ्या! इडली रेसीपीचा

Leave a Comment