Idli recipe in Marathi

Idli recipe in Marathi: दक्षिण भारतात इडली हा पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे. इडली हा महाराष्ट्रात देखील आता मागील दशकात खूपच प्रचलित होत आहे. घरोघरी इडलीचे भांडे येऊन पडले आहे. महिन्यातून एकदा तरी इडली खाल्लीच पाहिजे. त्यामुळेच आम्ही आज घेऊन आलोय Idli recipe in Marathi.

Idli Recipe । इडली बनवण्याचा विधी-

सामग्री: तांदूळ, उडीद डाळ(पांढरी), स्वादानुसार मीठ व मसाला.

१. तांदूळ व उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्यामध्ये मीठ व मसाला( मेथा, जिरा, बारीक मोहरी ) टाकून त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवा. 

२. हे मिश्रण ५-६ तास दमट ठिकाणी ठेवा.

३. इडली भांडे व्यवस्थित स्वच्छ करून त्याला तेल लावून घ्या जेणेकरून इडल्या चिकटणार नाहीत. इडली भांड्यात पाणी भरून खाच्यात व्यवस्थित प्रमाणात तांदूळ – उडीद पेस्ट भरून घ्या. 

४. आता भांडे गॅसवर ८ – १० मिनिट पूर्ण आचेवर ठेवा. त्यानंतर भांडे उतरवा. हळूहळू भांड्यातून इडल्या बाहेर काढा. 

Idli recipe in Marathi
Idli recipe in Marathi

इडली चटणी बनवण्याचा विधी

सामग्री: कोथिंबीर , ओले खोबरे , २-३ हिरव्या मिरच्या, लिंबू, आले, शेंगदाणे, मीठ.
१. वरील सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

२. हवे असल्यास पाणी मिसळू शकता.

३. कढीपत्ता व जिऱ्याची फोडणी दिल्यास उत्तम.
प्रत्येक सुट्टीला इडलीचा आस्वाद घ्या. आणि हि Idli recipe in Marathi कशी वाटली ते नक्की कळवा. आणखी काही कल्पना तुमच्याकडे असल्यास कळवू शकता.

हे सुद्धा वाचा- प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं…(?)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here