कॅल्शियम हा शरीराला अत्यंत आवश्यक असा घटक आहे. शरीराला बळकटी आणि मजबुती प्रदान करण्याचे काम कॅल्शिअम मार्फत होत असते. शरीरातील हाडे, स्नायू व दात मजबूत राहण्यासाठी कॅल्शिअम आवश्यक असते. संपूर्ण लेखात आपण कॅल्शिअम वाढवणाऱ्या घटकांची (Calcium Food in Marathi) माहिती घेणार आहोत.
Table of Contents
कॅल्शियम वाढवणारे पदार्थ – Calcium Foods List in Marathi
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराला पोषक अन्नाची आणि नियमित व्यायामाची गरज असते. पोषक घटकांची कमतरता झाल्यास शरीरात वेगवेगळ्या व्याधी निर्माण होत असतात. संपूर्ण पोषण आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांचा योग्य प्रमाणात समावेश असणे अत्यावश्यक आहे.
फायबर, लोह, प्रोटीन्स, सोडियम, पोटॅशियम यांप्रमाणेच कॅल्शिअम हा घटक देखील शरीरास आवश्यक असतो. कॅल्शिअमची कमतरता ही कोणत्याही वयात जाणवू शकते. मुलांच्या सर्वांगीण विकासात कॅल्शिअम महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रौढ व्यक्तींमध्ये हातापायाला मुंग्या येणे, हाडे दुखणे, दातांची समस्या आणि स्नायू दुखी अशा प्रकारच्या शारीरिक व्याधी आढळतात. अशा व्याधी न होण्यासाठी शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघणे अत्यावश्यक आहे.
खालील अन्नपदार्थांमध्ये कॅल्शिअम तसेच इतर पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीर स्वस्थ अनुभव करू शकते.
• दूध –
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहेत. लहानपणापासून आपण नेहमी दुधाचे सेवन करत आलेलो आहोत. दूध हा संपूर्ण आहार आहे असे म्हटले जाते कारण यामध्ये शरीरासाठी लागणारे सर्व पोषक घटक असतात.
लहानपणी शरीर वाढत असताना हाडांच्या मजबुतीसाठी दुधाचे सेवन करणे अत्यंत गरजेचे असते. तसेच प्रौढ वयात कॅल्शिअमची कमतरता जाणवल्यास दूध हा उत्तम पर्याय असू शकेल.
• पनीर –
पनीर हा दुग्धजन्य पदार्थ आहे. पनीरमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. हाडे आणि स्नायूंच्या बळकटीसाठी पनीरचे सेवन अत्यंत लाभदायक ठरेल.
• सुका मेवा –
सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रुट्स. अत्यंत महाग विक्री असल्याने सुका मेवा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही परंतु त्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेतल्यास नक्कीच आपण पैशांचा विचार करणार नाही. सुका मेवा हा अति प्रमाणात सेवन करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे सेवन करावे.
सुक्या मेव्यात प्रथिने, कॅल्शिअम, अत्यंत आवश्यक अशी सूक्ष्म खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण भरपूर असल्याने सुका मेवा हा आहारात घ्यायला सुरुवात करावीच. शेंगदाणे, बदाम, जर्दाळू, मनुका, काजू असे काही सुक्या मेव्याचे पदार्थ आहेत जे कॅल्शिअमचा उत्तम स्रोत मानले जातात.
• भाज्या –
हिरव्या भाज्या हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे. पालक, मेथी, आणि पुदिना यांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. लोह, फायबर अशा पोषकतत्वांसह कॅल्शिअम देखील विपुल प्रमाणात असल्याने हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्यास अनेक आरोग्यदायी लाभ होऊ शकतील.
ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर आणि गाजर अशा इतर प्रकारच्या भाज्यांमध्ये सुद्धा कॅल्शिअम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.
• सोयाबीन –
कॅल्शिअमचा सर्वात उत्तम शाकाहारी स्त्रोत म्हणजे सोयाबीन. जे लोक प्राणीजन्य आहार घेत नाहीत त्यांनी नक्कीच सोयाबीनचा आहारात समावेश करावा. दुधाचा पर्याय म्हणून सोयाबीनला पाहिले जाते. सोयाबीनचे नियमित सेवन हे हाडांना मजबुती प्रदान करते.
• अंडी –
शरीरातील प्रोटीन आणि कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्याचे काम अंडी करतात. जे नियमित व्यायाम करतात त्यांच्यासाठी तर अंडी हा अत्यंत पोषक पदार्थ आहे. अंडी हा स्वभावाने उष्ण असल्याने त्याचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
• सॅल्मन मासा –
सर्व प्रकारचे मांस आणि मासे हे कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहेत. त्यामध्ये सॅल्मन मासा हे विशेष उदाहरण देता येईल ज्यामध्ये कॅल्शिअम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. शरीराला बळकटी प्राप्त होण्यासाठी सॅल्मन मासा सेवन केल्यास उत्तम ठरेल.
(कोणतेही मांसाहारी सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. उत्तम आरोग्यासाठी किती प्रमाणात मांसाहार असावा याबद्दल डॉक्टर योग्य प्रकारे सांगू शकतील.)
• अंजीर
अंजीर या फळाचे सेवन नियमित केल्याने शरीराला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम प्राप्त होते. अंजीर फळातील फॉस्फरस आणि कॅल्शियम हे दोन घटक हांडाना मजबुती प्रदान करतात.
• लिंबूवर्गीय फळे –
संत्री, मोसंबी, द्राक्षे आणि आवळा ही फळे व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त कॅल्शिअमने देखील समृध्द असतात. त्यामुळे मानवी त्वचेसाठी आणि हाडांसाठी या फळांचे सेवन म्हणजे वरदानच ठरते. शिवाय या पदार्थांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
• टोमॅटो –
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही टोमॅटोचे सेवन सुरू केल्यास अत्यंत लाभ होईल.
• तिळ –
तिळ हा उष्णतावर्धक पदार्थ आहे. तिळामध्ये प्रथिनांचे आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. शरीरात कॅल्शिअम कमतरतेमुळे जर थकवा जाणवत असेल तर तिळाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.
कॅल्शियमचे अन्य स्त्रोत :
• मसाले – जिरे, लवंग आणि काळी मिरी.
• डाळी – राजमा, मूग, मसूर आणि चणे.
• धान्ये – बाजरी, गहू आणि नाचणी.
• फळे – आंबा, नारळ, अननस, टरबूज.
• सुका मेवा – बदाम, पिस्ता, अक्रोड.
अधिक वेळा विचारले जाणारे प्रश्न – Frequently Asked Questions
• कॅल्शियम काय आहे? – What Is Calcium In Marathi
शरीरातील हाडे आणि दात यांच्या बळकटीसाठी अत्यंत आवश्यक असणारे खनिज म्हणजे कॅल्शिअम! बहुतांश कॅल्शिअम हे हाडे आणि दातांमध्ये असते. एक ते दोन टक्के कॅल्शिअम हे इतरत्र शरीरात जसे की रक्त, स्नायू आणि पेशी द्रवामध्ये उपलब्ध असते.
• कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत? What are the symptoms of calcium deficiency?
मानवी शरीरात हाडे आणि सांध्यांची रचना असते. त्यांच्या बळकटीसाठी कॅल्शिअम अत्यंत आवश्यक आहे. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यास समजावे की कॅल्शिअमची कमतरता आहे.
स्नायूदुखी आणि दातांच्या समस्येत देखील कॅल्शिअमची कमतरता हे कारण असू शकते. कधीकधी योग्य आहार घेऊन सुद्धा शरीरात थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तरी कॅल्शिअम कमी झाले आहे असे आपण म्हणू शकतो.
• कॅल्शियम का आवश्यक आहे? Why Calcium is Important in Marathi
शरीरातील हाडे आणि स्नायूंच्या बळकटीसाठी कॅल्शिअम अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शिअमचे शरीरातील प्रमाण योग्य असल्यास मज्जासंस्था सुरळीत कार्य करते.
शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होणे, स्नायू मजबूत ठेवणे, हृदयगती साधारण ठेवणे, शरीरातील रसायने सक्रिय करणे, वजन संतुलन, रक्त गोठणे, अशा विविध शारिरीक क्रियांमध्ये कॅल्शिअम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
• कॅल्शियम वाढवणारे पदार्थ कोणकोणते आहेत? – Calcium Foods List in Marathi
दूध, पनीर, अंडी, सोयाबीन, हिरव्या भाज्या, सुका मेवा, संत्री, आवळा, शेंगा, मसूर, सॅल्मन मासा, टोमॅटो, अंजीर, डाळी आणि तीळ अशा विविध प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये विपुल प्रमाणात कॅल्शिअम असते.
जिरे, लवंग आणि काळी मिरी हे कॅल्शियमयुक्त मसाले पदार्थ आहेत. तसेच राजमा, मूग व चणे या डाळींमध्ये आणि बाजरी, गहू, व नाचणी या धान्यांमध्ये देखील कॅल्शिअम असते.
तुम्हाला कॅल्शिअम वाढवणारे अन्नपदार्थ (Calcium Food List In Marathi) हा लेख आवडला असल्यास तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा…