डोमेन – मराठी माहिती | Domain Information in Marathi

डोमेन हा सध्या डिजिटल क्षेत्रात नियमित वापरला जाणारा शब्द आहे. प्रत्येकाला त्याची माहिती असेलच असे नाही. त्यामुळे आम्ही डोमेन – मराठी माहिती (Domain Information In Marathi) या लेखात डोमेन विषयी सर्व माहिती दिलेली आहे. त्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Table of Contents

डोमेन म्हणजे काय? What is Domain Name In Marathi

डोमेन नेम – वेबसाईटचे नाव

आजकाल डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असेल. मार्केटिंग तर ठीक आहे पण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग म्हणजेच ऑनलाईन मार्केटिंग!

अशी मार्केटिंग करताना सर्वात basic एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते ती म्हणजे मार्केटिंग करणार कोठे? तर ते मार्केटिंग केले जाते वेबसाईट वर! वेबसाईट बनवल्यावर आपण ऍप पण बनवू शकतो.

वेबसाईट आणि होस्टिंग –

वेबसाईट वरील सर्व डाटा एका सर्व्हरवर साठवून ठेवला जातो. त्या सर्व्हरचे वार्षिक भाडे देखील आकारले जाते. त्यालाच वेबसाईटचे होस्टिंग असे म्हणतात. होस्टिंग घेतल्यावर आपण एक वेबसाईट किंवा मल्टिपल वेबसाइट्स तयार करून आपला डाटा इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांसमोर आणू शकतो.

होस्टिंग घेतल्यावर आपल्याला एक IP ADDRESS मिळत असतो ज्यावरून आपली वेबसाईट access होत असते. IP ADDRESS हा एक नंबर कोड असतो. त्यामुळे तो लक्षात ठेवणे शक्य नसते. त्याऐवजी वेबसाईटला एक नाव दिले जाते. त्यालाच डोमेन नेम असे म्हटले जाते.

डोमेन म्हणजे तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही तुमच्या वेबसाईटला देऊ शकता. ते नाव खूपच सर्च होत असेल तर तो डोमेन सर्वात महाग विकत घ्यावा लागतो आणि नाव नवीनच असेल तर साधारण किमतीत तो डोमेन विकत घेता येतो.

उदाहरण –

एक दुकान म्हणजे आपली वेबसाईट! त्या दुकानाच्या जागेचे भाडे म्हणजे होस्टिंग प्राइस. आणि त्यातील सर्व सामान म्हणजे आपला कंटेंट (डाटा). त्या दुकानाचे नाव म्हणजे वेबसाईटचे नाव अथवा डोमेन नेम.

डोमेनचे प्रकार – Domain Types In Marathi

1 – TOP Level Domain : टॉप लेवल डोमेन

याप्रकारचे डोमेन्स विशिष्ट क्षेत्र आणि कार्यपद्धतीसाठी वापरले जातात जेथे विविध प्रकारच्या सुविधा आणि फायदे देखील मिळत असतात.

उदाहरणे –
.com
.org
.gov
.edu
.info

2 – Country Code Top Level Domain :

CcTLD (country code top level domain) हा कोड देशाच्या नावावरून ठरवला जातो. देशाच्या नावाची पहिली आद्याक्षरे डोमेनमध्ये समाविष्ट असतात. वेबसाईट देशांतर्गत सर्च होणार असेल तर CcTLD डोमेन घेणे फायदेशीर ठरते.

उदाहरणे –
.us (United States)
.ch (China)
.uk (United Kingdom)
.in (India)

याव्यतिरिक्त Generic Top-Level Domain, Second-Level Domain आणि Third-Level Domain असेही प्रकार आहेत.

ऑनलाईन डोमेन विकत घेणे – How to buy an Online Domain in Marathi

GoDaddy ही वेबसाईट domain विकत घेण्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. त्याव्यतिरिक्त इतर साईट्स खाली दिलेल्या आहेत तेथे तुम्ही डोमेन विकत घेऊ शकता,

BlueHost
Domain.com
Namecheap
BuyDomains
Google Domain

डोमेन विकत घेताना .कॉम, .इन, .ओआरजी यानुसार किंमत ठरत असते. Keyword खूप प्रसिद्ध असल्यास त्या domain ची किंमत जास्त असते.

तुम्हाला डोमेन – मराठी माहिती (Domain Information in Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment

close