नक्की आहे तरी काय, हे कलम ३७0 व ३५ (अ)…

आज सकाळीच भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये भारताच्या संविधानमधील कलम ३७0 व कलम ३५ अ काढून टाकण्यासंबंधी प्रस्थाव मांडला व तो राज्यसभेने बहुमताने मंजूर सुद्धा केला. मोदी सरकारने घेतलेल्या या ऐतहासिक निर्णयाचे स्वागत आज संपूर्ण देशाने केले. या क्रांतिकारक निर्णयाची नोंद हि इतिहासात केली जाईल.

काय आहे कलम ३५ (अ) व कलम 3७0?

१) कलम ३५ (अ) मध्ये जम्मू काश्मीर ला स्वताचा संविधान व राज्यासाठी काही विशेष कायदे तयार करण्याचा अधिकार देण्यात आला होता.

२) कलम 370 मध्ये जम्मू आणि काश्मीर विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता व त्यामुळे भारतातले काही कायदे जम्मू काश्मीर मध्ये लागू होत नव्हते.

३) या कलमांमुळे जम्मू काश्मीर बाहेरील व्यक्तींना राज्यातील कोणतीही संपत्ती विकत घेता येत नव्हती तसेच राज्य सरकारने तयार केलेल्या विविध योजनांचा लाभ फक्त जम्मू काश्मीर मधील लोकांनाच मिळत होता.

४) जम्मू आणि काश्मीर मध्ये दुहेरी नागरिकत्व होते त्यामध्ये एक म्हणजे भारतीय आणि दुसर म्हणजे काश्मिरी पण आता हि कलम हटवल्यामुळे आता काश्मीर मधल्या लोकांना फक्त भारतीय हेच एक नागरिकत्व असणार आहे. यामुळे पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीला लगाम लावण्यात येऊ शकते.

५) कलम 370 मुळे केंद्र सरकारला कोणताही कायदा आणण्यासाठी जम्मू आणि काश्मीर सरकारची परवानगी घ्यावी लागत असे.

६) कलम 370 मुळे सरकारला जम्मू आणि काश्मीर मध्ये आर्थिक आणीबाणी लादण्याचा कोणताही अधिकार नव्हता. तसेच राज्याबाहेरील व्यक्तींना नोकरी मिळणे सुद्धा कठीण होते.

७) कलम 370 मधील तरतुदीमुळे जम्मू आणि काश्मिर ची घटना बरकास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नव्हता तसेच फक्त संरक्षण , विदेशी, दळणवळण संबंधीचे कायदे बनवण्याचा अधिकार हा केद्र सरकारला होता.

८) या कलमातील तरतुदींमुळे जम्मू आणि काश्मीर ला स्वताचा स्वतंत्र असा झेंडा होता. आता हि कलम हटवल्या मुळे भारताचा तिरंगा हाच एक ध्वज असेल. मोदी सरकारनुसार जम्मू आणि काश्मीर मधल्या दहशतवादाचे व अशांततेचे कलम ३५ (अ) व कलम 370 अस्तित्वात असणे हीच कारणे आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

तसेच जम्मू आणि काश्मीर चा पूर्ण राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याचे २ केंद्र प्रदेशमध्ये विभाजन करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर हे आता विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेश असेल तर लडाख हे चंडीगड प्रमाणे फक्त केंद्रशासित प्रदेश असेल.

अमरनाथ यात्रेवरील दहशदवादी हल्ल्याचा कट रोखण्यात सैन्यदल यशस्वी

1 thought on “नक्की आहे तरी काय, हे कलम ३७0 व ३५ (अ)…”

Leave a Comment