आई संपावर गेली तर – मराठी निबंध | Aai Sampavar Geli Tar – Marathi Nibandh |

आईचे प्रेम आणि वात्सल्य अफाट आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील आईचे महत्त्व कळून येण्यासाठी आई संपावर गेली तर (Aai Sampavar Geli Tar) हा निबंध लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

आई संपावर गेली तर… | Aai Sampavar Geli Tar – Essay In Marathi |

माझी आई काल गावी गेली होती. त्यातच काल सुट्टी असल्याने आम्हा सर्वांनाच घरी थांबणे भाग पडले होते. आम्हाला खऱ्या अर्थाने आईचे महत्त्व काल कळून आले. आमच्यावर जो कामाचा ताण आला तो सहन करणे अशक्य झाले होते. अशातच माझ्या मनात एक विचार डोकावून गेला, आई संपावर गेली तर…

आईचे काम आणि तिचे कर्तुत्व खरेच प्रशंसनीय आहे. माझ्या आईला दोन मुलं आहेत, मी आणि माझी बहिण! माझी आई सकाळी लवकर उठून आमचा आणि बाबांचा डबा बनवते. त्यानंतर घरची साफसफाई आणि स्वतःची सर्व कामे आवरते. आम्हाला शाळेसाठी तयार करते आणि शाळेत पाठवते.

आम्ही शाळेत गेल्यावर घरची इतर कामे उरकण्यावर तिचा भर असतो. शाळेत गेल्यावर देखील तिला तशी भरपूर कामे असतात. सर्व कामे ती अतिशय प्रेमपूर्वक आणि वात्सल्य भावाने करते. तिचा हसतमुख चेहरा मला नेहमी आवडतो.

आई संपावर गेली तर घरातील सर्व कामे मला आणि बाबांना करावी लागतील. बाबांना मग सकाळी लवकर उठावे लागेल. स्वतःचा डबा स्वतःच बनवावा लागेल आणि आमचा पण! मला आणि माझ्या बहिणीला घरची इतर कामे करावी लागतील.

माझी आई आम्हाला रोज एखादी गोष्ट सांगते. पण आई नसल्यावर मला गोष्ट कोण सांगणार! आज मोबाईल आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे पण आई ज्या पद्धतीने गोष्ट सांगते ती मला खूप आवडते. गोष्टीसाठी मग मला बाबांपाशी हट्ट धरावा लागेल.

आई संपावर जाणे हा विचारच मला अगदी नको नको वाटतो. कालच आई नव्हती तर मला सारखी तिची आठवण येत होती आणि घरची छोटी मोठी कामे करावी लागत होती. तिचा घरातला सहवास, प्रेम आणि काळजी या सर्वांनाच आम्ही काल मुकलो होतो.

आई आणि बाबा या दोघांमध्ये कधीकधी वाद होतात पण ते खूप साधे असतात. तेव्हा आम्हालाच खूप हसू येतं. काहीवेळा आम्ही नाराज असलो तर ते विनाकारण भांडतात आणि आमची करमणूक होते. आई नसल्यावर आम्हाला हसूच येणार नाही.

आई नसल्यावर प्रेमळ प्रसंग आम्हाला अनुभवता येणार नाहीत. आमच्या घरी सर्वांनाच आई खूप प्रिय आहे. प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे “आई संपावर गेली तर…” हा मला विचारसुद्धा करवत नाही.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला आई संपावर गेली तर (Aai Sampavar Geli Tar Marathi Nibandh) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment