फॉरेक्स हा शब्द फॉरेन एक्स्चेंज (Foreign exchange) या शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ म्हणजे परकीय चलनातील व्यवहार! एक चलन देऊन दुसरे चलन मिळवणे अशा देवाणघेवाणीला आपण फॉरेक्स ट्रेडिंग म्हणू शकतो.
परकीय चलनातील ट्रेडिंग म्हणजे काय याविषयी आपण फॉरेक्स ट्रेडिंग – मराठी माहिती (Forex Trading Marathi Mahiti) या लेखात जाणून घेणार आहोत.
फॉरेक्स ट्रेडिंग – Forex Trading
• फॉरेक्स ट्रेडिंगसाठी दोन चलने असतात. दोन चलनांची एक जोडी असते त्यामध्ये ट्रेडिंग केले जाते.
• आपल्या भारत देशात चलनांच्या सात जोड्यांमध्ये ट्रेडिंग केले जाते. यामध्ये डॉलर/रुपया, पौंड/रुपया, युरो/रुपया, जपानी येन/रुपया, डॉलर/येन, पौंड/डॉलर, युरो/डॉलर या चलनाच्या जोड्यांचा समावेश होतो.
• एखाद्या नोंदणीकृत ब्रोकरकडून आपण यामध्ये ट्रेडिंग करू शकता अथवा ऑनलाईन संकेतस्थळाचा किंवा ॲपचा वापर करू शकता.
• फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आपल्याला सरासरी फायदा होण्यासाठी जास्त रक्कम गुंतवावी लागते. परकीय चलनाचा दर हा आपल्या रुपयापेक्षा जास्त असल्याने गुंतवली जाणारी रक्कम ही आपल्याला जास्त वाटते.
• परकीय चलनाचा दर वाढल्यास आपल्याला त्या प्रमाणात फायदा होतो. आपल्याला हवा असणारा फायदा तयार झाला की आपण चलनाची विक्री करणे योग्य ठरते.
• साधारणपणे फॉरेक्स ट्रेडिंग ही बँका, निर्यातदार, वित्तीय संस्था अशा माध्यमांतून केली जाते.
• ब्रोकरेज संस्था ग्राहकाला मिळणाऱ्या फायद्यातून काही रक्कम प्राप्त करतात. ते शुल्क वार्षिक असते.
• भारतात फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी एनएसई (NSE), बीएसई (BSE), एमसीएक्स-एसक्स (MCX-SX) इ. प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.
• सेबीद्वारे नोंदणीकृत ब्रोकरच्या मार्फतच फॉरेक्स ट्रेडिंग खाते सुरू करावे लागते. थेट कोणताही व्यक्ती ट्रेडिंग करत नाही. ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीच्या रक्कमेची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते.
• सध्याच्या काळात कोटक सिक्युरिटी, रिलायन्स सिक्युरिटी, पांच पैसा, एंजल ब्रोकिंग, जिरोधा, आयसीआयसीआय डायरेक्ट यासारखे अनेक प्लॅटफॉर्मचे पर्याय उपलब्ध आहेत.
• सर्व फॉरेक्स ट्रेडिंग एजन्सींनी गुंतणूकदारांना थेट ट्रेडिंग करणे आणि संकेतस्थळ किंवा अॅपची सुविधा प्रदान केली आहे. कोणताही व्यक्ती जो चलनात गुंतवणूक करु इच्छित आहे, तो या अॅपवर थेटपणे फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो.
तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय (Forex Trading Marathi Mahiti) याबद्दल सर्व माहिती समजली असेल अशी आशा…