वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची निवड करण्यात आलेली आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ वेस्ट इंडीज विरूध्द दोन कसोटी सामने खेळणार आहे.
कसोटी संघात चेतेश्वर पुजाराची निवड झाली नसल्याने आश्चर्य आहे. परंतु त्याऐवजी नवख्या दमाचा खेळाडू ऋतुराज गायकवाडला संधी मिळाल्याने त्या संधीचे तो सोने करेल अशी अपेक्षा आहे. ऋतुराज गायकवाड देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे.
अजिंक्य रहाणे संघात परतला असल्याने भारतीय फलंदाजीची मधली फळी मजबूत झालेली आहे. यशस्वी जयस्वालला देखील कसोटी संघात संधी मिळालेली आहे परंतु तो अंतिम अकरा खेळाडूंत खेळेल की नाही याबाबत शंका आहे. गोलंदाजीची कमान सिराज, आश्विन आणि जडेजा यांच्यावर असणार आहे.
कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.