प्रश्न – जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – जागतिक योग दिवस हा प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो.
प्रश्न – जागतिक योग दिवस 2023 ची संकल्पना (theme) काय आहे?
उत्तर – वसुधैव कुटुम्बकम या सिद्धांतानुसार “वन वर्ल्ड, वन हेल्थ” ही 2023 सालची संकल्पना आहे.
जागतिक योग दिन – World Yoga Day
• मानवाच्या विकासासाठी योग ही संकल्पना खूपच फायदेशीर ठरत आहे. मानवासाठी शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर योग जीवनपद्धती उपयुक्त ठरलेली आहे. प्राचीन काळापासून भारतात योगा ही संकल्पना प्रचलित आहे.
• योग जीवनपद्धतीचा उपयोग संपूर्ण जगभरात व्हावा आणि मानवी जीवन निरोगी, उत्साही आणि आनंदी व्हावे यासाठी संपूर्ण जगभरात 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा केला जातो.
• भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत जागतिक योग दिनाची घोषणा केली. त्यानंतर जागतिक योग दिन हा सर्वप्रथम 21 जून 2015 रोजी जगभरात अत्यंत उत्साहात आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा करण्यात आला.
• योगाचे महत्त्व सर्व जनमानसांत कळावे आणि त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात व्हावा यासाठी जागतिक योग दिवस विशेष महत्त्व ठेवतो. योगविषयी जागरूकता निर्माण होऊन मानवाने एका आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करावी अशी धारणा योग दिनानिमित्त निर्मित होत असते.
• मागील काही वर्षातील जागतिक योग दिनाच्या संकल्पना पुढीलप्रमाणे –
2017 – आरोग्यासाठी योग
2018 – शांततेसाठी योग
2019 – हृदयासाठी योग
2020 – कौटुंबिक योग
2021 – कल्याणकारी योग
2022 – मानवतेसाठी योग
• जागतिक योग साजरा करताना सोशल मीडियाचा भरपूर वापर होताना दिसत आहे. जागतिक योग दिवस निमित्त सर्वजण स्वतः एखादा योगा प्रकार करताना स्वतःचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर अपलोड करताना दिसतात. तसेच योग दिनाचे शुभेच्छा संदेश सर्वत्र पाठवले जातात.
तुम्हाला जागतिक योगा दिवस 2023 – मराठी माहिती (International Yoga Day 2023 Marathi Mahiti) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…