जागतिक पर्यावरण दिन 2023 _ मराठी माहिती

जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) हा दिवस 5 जून रोजी संपूर्ण जगभरात अत्यंत उत्साहात आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी पर्यावरण दिन साजरा करताना दिनाचा विषय काय आहे तसेच त्याविषयीची माहिती या लेखात चर्चा करण्यात आलेली आहे.

जागतिक पर्यावरण दिन 2023 – World Environment Day 2023

• पर्यावरण मानवासाठी आणि इतर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. अशा पर्यावरणाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. ते संवर्धन होण्यासाठी आणि तशी समज विकसित होण्यासाठी पर्यावरण दिन साजरा करण्यात येत असतो.

• पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा उद्देश्य समोर ठेऊन दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक शक्य अशा पद्धतीने लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते.

• भारत सरकारने ‘मिशन लाइफ’ हे ध्येय समोर ठेवून ‘जागतिक पर्यावरण दिन – 2023’ साजरा करण्याचे योजिले आहे. संपूर्ण देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हा दिन अत्यंत उत्साहात साजरा केला गेला.

मिशन लाईफ काय आहे?

मिशन लाईफ ही भारताच्या पंतप्रधानांनी ग्लासगो येथे UNFCCC COP261 च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत सुरू केलेली संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत जीवनशैली आणि पद्धतींचा अवलंब करण्याचे उद्दिष्ट जाणवून दिले.

अनावश्यक उपभोग टाळून एका जाणीवपूर्वक जीवनशैली कशी असू शकेल आणि तिचा अवलंब करण्यावर भर दिला. शाश्वत जीवनशैलीसाठी त्यांनी पाच तत्त्वे मांडली.

1. जीवनाच्या सर्व प्रकारांचा आदर
2. मातृ निसर्गाचा आदर
3. विविधतेचा आदर
4. स्थानिक उपायांसाठी आदर
5. वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा आदर

मिशन LiFE हे केवडिया, गुजरात येथे 20 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) सुरू केलेली एक जनसंघटन मोहीम आहे. या मोहिमेत सहा थीम्स समाविष्ट आहेत –

1. कमी कचरा
2. पाणी संरक्षित
3. उर्जेची बचत करणे
4. हिरवी गतिशीलता
5. हिरव्या जागा
6. हिरवा आहार

जागतिक पर्यावरण दिन अर्थपूर्ण करण्यासाठी MoEFCC इतर केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, संस्था आणि खाजगी संस्था यांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावर मिशन LiFE चे कार्य पूर्ण होत आहे.

1. missionlife-moefcc.nic.in
2. merilife.org

COP26 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
MoEFCC ने 15 मे 2023 रोजी “मेरी लाइफ” (माय लाइफ) नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन देखील लॉन्च केले आहे.


पर्यावरण दिन 2023 –

मिशन लाइफसाठी 5 जून 2023 रोजी भारतात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. यावेळी स्वच्छता मोहीम, लाइफ मॅरेथॉन, प्लास्टिक संकलन मोहीम, सायकल रॅली, वृक्षारोपण मोहीम, कंपोस्टिंग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक पर्यावरण दिन 2023 थीम –
“Beat Plastic Pollution”

यावर्षी पर्यावरण दिनाची थीम ही प्लास्टिकचा समूळ नाश (प्लास्टिकला हरवा/ प्लास्टिक हटाव) अशी आहे. प्लास्टिकचा वापर दैनंदिन स्तरावर वाढलेला आहे. त्यामुळे त्याचा वापर न करता त्याचा वापर टाळणे गरजेचे असल्याने त्यानिमित्ताने जनजागृती करण्याचा उद्देश्य यावर्षी पर्यावरण दिनानिमित्त ठेवण्यात आलेला आहे.

Leave a Comment