प्रस्तुत लेख हा ससा तो तसा की कापूस जसा या शांताराम नांदगावकर यांच्या प्रसिद्ध कवितेचे बोल आहेत. ही कविता प्रत्येक बाल मराठी मनावर राज्य करते. चला तर मग पाहुयात या कवितेचे बोल!
ससा तो ससा की कापूस जसा – Sasa To Sasa ki Kapus Jasa
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहिले
वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही ससा
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई
निजला तो संपला, सांगे ससा
ससा तो ससा की कापूस जसा (Sasa to sasa ki Kapus Jasa Kavita Marathi) या कवितेत तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला आठवली असेलच… संपूर्ण लेख वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!