प्रस्तुत लेख हा माझी आई (Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi) या विषयावर आधारित १० ओळींचा मराठी निबंध आहे. या निबंधात आईची महती वर्णिलेली आहे. त्याग, प्रेम, स्नेहभाव, काळजी असे अनेक गुण आईमध्ये अनुभवायला मिळतात.
प्रत्येक स्त्री ही आई झाल्यानंतर तिचे व्यक्तिमत्त्व हळूहळू असे काही बनत जाते की ती वात्सल्याचे मूर्तिमंत रूप बनते. प्रत्येक लहान मुलासाठी आई म्हणजेच सर्वस्व असते. तिचा जिव्हाळा आणि आपुलकी ही प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर टिकून राहते.
माझी आई या निबंधात तुम्हाला १० ओळींमध्ये आईचे गुणात्मक वर्णन अत्यंत स्पष्टपणे समजेल. चला तर मग पाहुयात माझी आई हा निबंध!
माझी आई निबंध मराठी १० ओळी | My Mother 10 Lines Essay In Marathi |
१. आई ही प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वस्व असल्याने तिला ईश्वराचे दुसरे रूप मानले जाते.
२. माझी आई माझा खूप लाड करते, त्यामुळे माझी आई मला खूप आवडते.
३. मी, माझी बहीण आणि माझे बाबा, तिघांच्याही आवडीनिवडी आईला माहीत असल्याने ती आमच्या तिघांचा व्यवस्थित सांभाळ करते.
४. बाबा कामावर तर मी आणि माझी बहीण सकाळी शाळेत जात असल्याने आई तिघांचेही जेवण लवकर बनवते.
५. आम्ही शाळेत गेल्यावर आई घरातील व बाहेरील अशी सर्व कामे आटोपते.
६. माझ्या आईला बागकाम व शिवणकाम खूप आवडते.
७. आईच्या मेहनतीमुळे आमची बाग सदाहरित असते. सुट्टी दिवशी आम्हीही बागकामात आईची मदत करतो.
८. माझी आई समंजस आणि हसतमुख असल्याने घरी जास्त वादविवाद होतच नाहीत.
९. आमच्या भविष्याची काळजी असल्याने माझी आई नियमितपणे आमचा अभ्यास घेत असते.
१०. माझी आई ही कुटुंबात एक महत्त्वपूर्ण, प्रेमळ व सर्वांची काळजी करणारी व्यक्ती आहे.
तुम्हाला माझी आई हा १० ओळींचा मराठी निबंध (Majhi Aai 10 Oli Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…