जागतिक दृष्टिदान दिन – मराठी माहिती | Jagatik Drushti Dan Din Mahiti Marathi |

प्रस्तुत लेख हा जागतिक दृष्टिदान दिनाविषयी मराठी माहिती (Jagatik Drushti Dan Din Mahiti Marathi) आहे. जागतिक दृष्टिदान दिन कधी व कसा साजरा केला जातो तसेच दृष्टिदानाचे महत्त्व काय आहे याबद्दल प्राथमिक स्वरूपाची चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे.

प्रश्न – जागतिक दृष्टिदान दिन (World Eye Donation Day) कधी साजरा केला जातो?
उत्तर – दरवर्षी १० जून रोजी जागतिक दृष्टिदान दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

दृष्टिदानाचे / नेत्रदानाचे महत्त्व –

• एखादा व्यक्ती जन्मतः अंध असल्यास किंवा अपघाती त्याची दृष्टी गेलेली असल्यास त्याला नेत्रदानाने दृष्टी प्राप्त होऊ शकते.

• नेत्रदान हे व्यक्तीच्या संमतीने करवून घेतले जाते आणि ते मृत्युनंतरच केले जात असल्याने   आयुष्य जगताना व्यक्तीच्या आयुष्यात दृष्टीबाबत कोणतीही अडचण येत नाही.

• आपला मृत्यू झाल्यानंतर डोळ्यांचा स्वतःला आणि कुटुंबीयांना देखील काहीही उपयोग होत नसतो. जर आपण ते दान केले तर कोणत्याही दृष्टीहीन व्यक्तीला त्याचा लाभ होऊ शकतो.

• जगभरातील दृष्टीहीनतेची समस्या ओळखून त्यावर उपाय म्हणून नेत्रदान ही संकल्पना लोकांसमोर मांडण्यात आली. त्यानिमित्ताने जनजागृती होण्यासाठी जागतिक स्तरावर दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो.

जागतिक दृष्टिदान दिनाचा उद्देश्य –

• सर्वांना नेत्रदानाचे महत्त्व कळावे आणि मरणोत्तर त्यांच्याकडून नेत्रदान व्हावे ज्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला त्याचा लाभ होईल आणि त्याला दृष्टी प्राप्त होईल.

• नेत्रदान कसे केले जाते हे व्यवस्थित समजण्यासाठी त्यासंदर्भात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जगभरात जागतिक दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो.

जागतिक दृष्टिदान दिन कसा साजरा केला जातो?

• दृष्टिदान विषयक विचार आणि संदेश पोचवणाऱ्या प्रतिमा आणि मोठमोठे फलक जागोजागी उभारले जातात.

• सोशल मीडियाचा उपयोग करून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देणारे संदेश सर्वत्र पाठवले जातात तसेच त्या संदर्भात स्टेटस ठेवले जातात.

• दृष्टिदान करण्याबाबत जनमानसांत जागृती केली जाते तसेच सामाजिक मोहिमा राबवल्या जातात जेणेकरून समाजातील लोक नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतील.

नेत्रदान न करण्यामागची कारणे –

“नेत्रदान हेच श्रेष्ठ दान” असे आपण वारंवार ऐकत असतो. एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याचे डोळे हे दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला उपयोगी पडू शकतात.

दृष्टीहीन व्यक्तीला नेत्रदानामुळे दृष्टी प्राप्त होऊ शकते. परंतु समाजात आजही नेत्रदानाविषयी तेवढी जागरूकता असल्याचे जाणवत नाही. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे असू शकतील –

१. सामाजिक धारणा

२. करुणामय वृत्ती

३. सामाजिक संस्था व संघटना यांच्या उपक्रमशीलतेचा अभाव

४. जागरूकतेचा अभाव

५. धार्मिक संकल्पना

नेत्रदान करताना घ्यावयाची काळजी –

• व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रदान करवून घ्यावे.

• मृत्यू झाल्यानंतर डोळ्यांवर कापसाचा बोळा ठेवावा.

• अपघाती किंवा अन्य कारणांनी मृत्यू झाल्यास डोळ्यांमध्ये सूक्ष्म जंतुनाशकाचे थेंब टाकावेत.

• नेत्रदानाची प्रक्रिया करताना डोळ्यांना कोणताही संसर्ग नाही ना, हे तपासून पाहावे. अथवा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी.

• डोळ्यांचे आजार असल्यास नेत्रदान करू नये.

तुम्हाला जागतिक दृष्टिदान दिन – मराठी माहिती (Jagatik Drushti Dan Din Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment