प्रस्तुत लेख हा छत्रपती शिवाजी महाराज (10 Lines Essay On Shivaji Maharaj in Marathi) यांच्या जीवनावर आधारित १० ओळींचा मराठी निबंध आहे. महाराजांचे कर्तृत्त्व स्पष्ट करणारा हा निबंध अत्यंत मुद्देसूद आणि स्पष्ट भाषेत व्यक्त करण्यात आलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज – १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay On Shivaji Maharaj in Marathi
१. स्वतंत्र मराठा साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते.
२. शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला.
३. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते.
४. शिवराय गनिमी कावा, घोडेबाजी, तलवारबाजी, राजनिती तसेच युद्धनितीत पारंगत होते.
५. “अफजलखान वध”, “शायिस्ते खानाची बोटे कापणे” अशा प्रसंगांतून शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसून येतो.
६. पुरंदरचा तह, आग्रा येथून सुटका अशा बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.
७. शिवरायांना निकटवर्तीय सरदारांची आणि मावळ्यांची नेहमीच साथ लाभली. त्या सर्वांच्या मदतीने शिवरायांनी स्वराज्य निर्मिती केली.
७. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले.
८. शिवरायांनी आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.
९. इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली.
१०. आजही आपण छत्रपती शिवरायांच्या स्मरणार्थ “शिवजयंती” मोठ्या उत्साहात साजरी करतो.
तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज – १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay On Shivaji Maharaj in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…