मुंगी मराठी माहिती | Ant Information in Marathi | Mungi Marathi Mahiti |

आपणा सर्वांना मुंगी परिचयाची आहे. घरादारात, परिसरात आणि रानावनात अशा सर्व ठिकाणी मुंग्यांचा वावर असतो. प्रस्तुत लेखात मुंगी (Ants Information in Marathi) या किटकाबद्दल मराठी माहिती देण्यात आलेली आहे.

मुंगीची मराठी माहिती | Ant Information in Marathi |

आपण सर्वांनी मुंगी आणि हत्ती, मुंगी आणि साप, मुंगी आणि कबूतर यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत यावरून आपल्याला कळते की मुंगी हा हुशार आणि मेहनती कीटक आहे.

मुंगी या किटकाला सहा पाय आसतात आणि तो खूप छोटा असतो तसेच मुंग्या सर्वत्र आढळतात. मुंगीला इंग्लिशमध्ये अँट (Ant) असे म्हणतात.

मुंगीची शरीररचना –

डोके, वक्ष, कंबर, उदर, पाय, जबडा, डोळे, मिशा अशा प्रकारची मुंगीच्या शरीराची बाह्य रचना असते. मुंगीच्या अन्नमार्ग शरिरापेक्षा जास्त लांब असतो.त्यामुळे त्याची वेटोळे रचना अंतर्भागात आढळते. मुंगीच्या अंतर्भागात अन्नमार्ग, नांगी, दाहक द्रव्य ग्रंथी, गुच्छिका, तोंड, मेंदू असे अवयव आढळतात.

मुंगीचे प्रकार आणि राहणीमान –

मुंग्या जमिनीमध्ये वारूळ तयार करून वसाहती करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त ५ लाख मुंग्या राहू शकतात. कामकरी मुंग्या, शिपाई मुंग्या, मादी मुंग्या किंवा राणी मुंग्या, आणि नर मुंग्या अशा चार प्रकारच्या मुंग्या एका वसाहतीत आढळतात.

कामकरी मुंग्या आकाराने लहान असतात. शिपाई मुंग्या कामकरी मुंग्यासारख्याच असतात परंतु आकाराने थोड्या मोठ्या असतात. मादी किंवा राणी मुंग्या आकाराने बऱ्याच मोठ्या असतात व त्यांना पंख असतात. नर मुंग्या आकाराने लहान असतात आणि त्यांचे पंख नाजूक असतात.

मुंग्यांच्या निवासस्थानाला वारूळ असे म्हणतात. ते मातीचे असते. मुंग्यांच्या सरळ रेषेत चालण्याने त्यांची शिस्त दिसून येते. मुंगी हा सतत उद्योग करत राहणारा कीटक आहे.

मुंग्या आपली घरे दगडाखाली, वाळलेल्या पालापाचोळ्या खाली ,लाकडाच्या बुंध्यात बांधतात. मुंग्या अन्न गोळा करण्यासाठी दूरवर फिरतात त्यावेळी त्या एक विशिष्ट प्रकारचे द्रव्य पसरवतात. त्यास “फरोमोन” असे म्हणतात. त्या द्रव्यामुळे मुंग्या वारुळात पुन्हा येऊ शकतात.              

मुंग्यांचे अन्न विविध प्रकारचे असते. अनन्या जातीच्या मुंग्या बारीक कीडे खातात तसेच आपल्या माहितीनुसार झाडाचे बी, तृणधान्य, गोड पदार्थ, फुलातील मध हे मुंग्यांचे अन्न असते.

लेखन सौजन्य – प्रीती पवार (सातारा)

तुम्हाला प्रस्तुत लेख मुंगी मराठी माहिती (Ant Information In Marathi) आवडली असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

तुम्हालाही तुमचे वैविध्यपूर्ण लेख आणि उपयोगी माहिती प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्कीच आम्हाला खालील मेल आयडी वर संपर्क साधा. काही नियम व अटी अंतर्गत ते लेख नावासहित प्रसिद्ध केले जातील.

निरंजन पवार – Email ID –
niranjn1002@gmail.com

Leave a Comment