अभियंता दिन – मराठी निबंध | Engineers Day Essay in Marathi |

प्रस्तुत लेख हा अभियंता दिन – मराठी निबंध (Engineers Day Essay in Marathi) आहे. विद्यार्थ्यांना हा निबंध व्यवस्थितरित्या लिहता येण्यासाठी अभियंता दिवस कधी व कसा साजरा केला जातो याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

अभियंता दिवस (इंजिनिअर्स डे) – १५ सप्टेंबर मराठी निबंध | Engineers Day Marathi Nibandh |

तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विकासामुळे प्रत्येक देश विकसित होत असतो. त्या विकासासाठी अभियंता हे पद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. सध्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे.

महान भारतीय अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी अभियंता दिवस साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि उद्योगांचा सन्मान केला जातो.

विश्वेश्वरय्या हे म्हैसूरमधील कावेरी नदीवर कृष्णा राजा सागर धरणाच्या बांधकामाचे मुख्य अभियंता होते. हे धरण त्यावेळी आशियातील सर्वात मोठे जलाशय होते. त्यांच्या असाधारण कामगिरीमुळेच भारतातील जलसंपत्ती विकास शक्य झाला.

जलसिंचन, नदी – बंधारे, धरण अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांतील त्यांचे योगदान मोलाचे ठरले होते. त्यासाठी १९५५ साली “भारतरत्न” या भारतातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

मागील शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान कमालीचे विकसित झाले. त्या विकासासाठी अभियंते कारणीभूत ठरलेले आहेत. संशोधक अथवा वैज्ञानिक जो शोध लावतात त्याचा पाठपुरावा करून दैनंदिन जीवनात तो शोध उपयोगात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अभियंते करत असतात.

सध्या विविध प्रकारचे अभियंते प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, आणि सिव्हिल अशी काही मुख्य प्रकारची उदाहरणे देता येतील.

मागील काही दशकांत अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडलेले आहेत. भारतात अभियांत्रिकी शिक्षण आणि प्रशिक्षण अशा प्रकारे देण्यात आलेले आहे की सध्या असंख्य भारतीय तरुणाई अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहे.

शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था तसेच अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये अभियंता दिन साजरा केला जातो. त्या दिवशी एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थी भाषणे देतात आणि विविध सांस्कृतिक उपक्रम देखील साजरे केले जातात.

तुम्हाला अभियंता दिन हा मराठी निबंध (Engineers Day Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…धन्यवाद!

Leave a Comment