चेन्नईचा मुंबईवर 20 धावांनी विजय | मुंबई विरुद्ध चेन्नई लाईव्ह मॅच

चेन्नईच्या 20 षटकांत 156 धावा –

पहिल्या 6 षटकांच्या पॉवर प्ले मध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत चेन्नईच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यामध्ये डू प्लेसी, मोईन अली, रैना, आणि धोनी अशा दिग्गज फलंदाजांचा समावेश होता. पहिल्या सहा षटकांत चेन्नईचा स्कोअर 24/4 असा होता.

धोनीचा बळी गेल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि जडेजा यांनी धावगतीला आकार देत खेळ चालू ठेवला. ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक लगावत अवघ्या 58 चेंडूत 88 धावांची खेळी केली.

डावाच्या शेवटी ब्रावोने अप्रतिम फटकेबाजी करीत अवघ्या 8 चेंडूत 23 धावा पटकावल्या. त्यामध्ये त्याच्या सलग 3 षटकारांचा देखील समावेश होता. बुमराहने जडेजा आणि ब्रावोला बाद केले. डावाच्या शेवटी गायकवाड आणि शार्दुल ठाकूर नाबाद राहिले.

बुमराह, मिल्ने आणि बोल्टने प्रत्येकी 2 – 2 बळी घेतले.

मुंबईच्या 136 धावा | सौरभ तिवारीची एकाकी झुंज

मुंबईने पहिल्या आठ षटकांत 48 धावा जमवत 3 फलंदाज गमावले. त्यामध्ये डी कॉक, सूर्यकुमार आणि अनमोल प्रीतचा समावेश होता.

इशान किशन आणि सौरभ तिवारी यांनी डाव पुढे चालू ठेवला परंतु इशान किशन 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पोलार्ड देखील 14 व्या षटकात बाद झाल्याने मुंबईची स्थिती बिकट झालेली होती. तेव्हा मुंबईने 87 धावांवर 5 फलंदाज गमावले होते.

मुंबईचे सर्व फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत गेले. त्यामुळे आवश्यक धावगती वाढत गेली आणि 20 धावांनी मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. सौरभ तिवारीने 40 चेंडूत 50 धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याला इतर कोणाचीच साथ लाभली नाही.

चेन्नईने हा सामना जिंकत आपल्या प्ले ऑफ मध्ये खेळण्याची संधी वाढवली आहे.

Leave a Comment