माझा आवडता प्राणी – घोडा मराठी निबंध | Horse Essay in Marathi |

प्रस्तुत लेख हा घोडा या प्राण्याविषयी मराठी निबंध (Horse Essay in Marathi) आहे. घोड्याची जीवनशैली, वास्तव्य, त्याचे राहणीमान अशा स्वरूपाची माहिती या निबंधात देण्यात आलेली आहे.

घोडा प्राणी निबंध | My Favourite Animal Horse Essay In Marathi |

आपण आत्तापर्यंत घोड्यांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. प्राचीन इतिहासात त्याची वर्णने वाचलेली आहेत. चित्रपट, मालिका यांमधून सुध्दा घोडा हा प्राणी पाहायला मिळतो. घोड्याची सवारी करणे सर्वजण पसंद करतात. लग्न समारंभ, मिरवणूक अशा प्रसंगी घोड्याचा उपयोग होत असतो.

घोडा हा ईक्विडी कुळातील सस्तन प्राणी आहे. त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस असे आहे तर इंग्रजीमध्ये त्याला हॉर्स (Horse) असे म्हटले जाते. वाहतूक, पूर्वीच्या काळातील युद्ध, विविध खेळ यासाठी घोड्यांचा वापर केला जात असे.

सर्व प्रगत देशांमध्ये सध्या शर्यतीसाठी घोड्याचा उपयोग केला जातो. घोडा हा ८ तासात १४०० किमी अंतर धावू शकतो. पूर्वी स्वयंचलित वाहने नसताना घोडागाडी हा प्रवासासाठीचा उत्तम प्रकार आपल्याला पाहायला मिळायचा.

घोड्यांच्या शरीराची लांबी ही सुमारे ३०० सेमी इतकी असते. त्याचे शेपूट ९० सेमी इतके लांब असते. घोड्याचे वजन सरासरी ३५० कि.ग्रॅ. असते. शरीराच्या मानाने त्याचे डोके हे आकाराने मोठे असते व ते त्याच्या रंगाहून गडद असते. घोड्याचे कान मात्र लहान असतात.

पांढरा, काळा, तपकिरी अशा विविध रंगांचे घोडे आपल्याला आढळतात. त्याच्या अंगावर हिवाळ्यात दाट केस येतात आणि उन्हाळ्यात विरळ होतात. परंतु शेपूट आणि आयाळीतील केस कधीच दाट किंवा विरळ होत नाहीत ते तेवढेच राहतात.

घोडयामध्ये ऐकण्याची व गंध घेण्याची क्षमता चांगली असते. घोडे हे जंगलात असल्यावर कळपाने राहतात. घोडा हा सतर्क प्राणी आहे, त्याचे सतत आजूबाजूला लक्ष असते. त्याच्या कळपातील नर घोडा हा त्या सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो.

घोडा हा शाकाहारी प्राणी आहे. तो गवत खातो. घोड्याला हरभरा खायला जास्त आवडतो. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात. दोन वर्ष झाली की शिंगरू त्याच्या आईपासून वेगळे होते. घोडा हा साधारणतः २० ते ३० वर्षे जगू शकतो.

घोडा हा प्राणी कष्टाळू स्वभावाचा आहे तसाच तो चपळही आहे. जगातील वेगवेगळ्या हवामानात तो राहू शकतो व गवतात चरून जगू शकतो. त्यामुळे त्याचा उपयोग मानवाला प्राचीन काळापासून होत आलेला आहे तसेच सध्याही सर्व वयोगटातील लोकांना घोड्याची सवारी करायला आवडतेच.

तुम्हाला माझा आवडता प्राणी घोडा हा मराठी निबंध (Horse Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment