पंडित जवाहरलाल नेहरू – मराठी निबंध! Jawaharlal Nehru Essay In Marathi |

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन हे स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यानंतर जबाबदारीने सांभाळलेले पंतप्रधानपद यामध्ये विभागले जाऊ शकते. त्यांच्या आयुष्याची आणि संघर्षमय राजकीय प्रवासाची माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू निबंध ( Jawaharlal Nehru Essay In Marathi ) लिहायचा असतो. निबंध लिहताना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना आणि राजकीय कारकीर्द त्याबरोबरच व्यक्तिगत आयुष्य देखील शब्द स्वरूपात मांडायचे असते.

माझा आवडता नेता ( Majha Awadta Neta ) किंवा व्यक्तीविशेष या विभागात विद्यार्थ्यांना हा निबंध लिहावा लागतो. निबंध लिहताना नेत्याबद्दलची एकदम खरी माहिती असणे आवश्यक आहे. हा निबंध लिहायचा म्हणजे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. कोणताही नेत्याचा संपूर्ण जीवन काळ थोडक्यात मांडणे अपेक्षित असते. चला तर मग पाहूया, कसा लिहायचा माझा आवडता नेता हा निबंध!

पंडित जवाहरलाल नेहरू – मराठी निबंध! My Favorite Leader – Jawaharlal Nehru Essay In Marathi |

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक अग्रगण्य नेते होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचा संघर्ष आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीत त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे. जवाहरलाल नेहरू हे खूपच संवेदनशील मनाचे होते. त्यांना लहान मुले आणि गुलाबाचे फुल खूप आवडत असे. लहान मुले आणि इतर निकटवर्तीय लोक त्यांना “चाचा” म्हणून संबोधत असत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते. वयाच्या २६ व्या वर्षी ते कमला कौल यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी हे कन्यारत्न १९१७ मध्ये प्राप्त झाले. पंडित नेहरू हे व्यवसायाने बॅरिस्टर होते. नंतरच्या काळात त्यांनी राजकारणात आपली कारकीर्द सुरू केली.

जवाहरलाल नेहरू यांचे बालपणीचे शिक्षण हे खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे शिक्षणासाठी गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी नॅचरल सायन्स या विषयात पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते १९१२ साली भारतात परतले आणि स्वतःचा राजकीय प्रवास त्यांनी सुरू केला.

१९१६ मध्ये जेव्हा ते महात्मा गांधीजींना भेटले तेव्हा त्यांना स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची प्रेरणा मिळाली. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अध्यक्ष झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी केलेल्या असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.

१९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. त्यांनी १९२८ मध्ये स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्य हेच आपले ध्येय असल्याचे निश्चित केले गेले. १९३१ मध्ये त्यांचे वडील मोतीलाल यांचा मृत्यू झाला.

पंडित नेहरू यांना मिठाचा सत्याग्रह आणि अन्य आंदोलनांमुळे अनेकवेळा कारावास भोगावा लागला. स्वतःचे आत्मचरित्र त्यांनी अल्मोडा जेलमध्ये असताना इ.स. १९३५ मध्ये पूर्ण केले. त्यांच्या पत्नी कमला नेहरू यांचे अकाली निधन १९३६ मध्ये झाले. १९४२ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी “भारत छोडो” ही क्रांतीकारी घोषणा केली. त्यामुळे लगेच त्यांना अटक करण्यात आली. ही कैद त्यांची दीर्घकाळ टिकून होती. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. आपल्या जीवनात त्यांनी एकूण ९ वेळा कारावास भोगला.

६ जुलै १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. अध्यक्ष म्हणून त्यांनी १९५४ पर्यंत हा पदभार सांभाळला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. अत्यंत निष्ठावंत, सतत प्रसन्न आणि मानवी गुण जोपासणारा नेता म्हणून ओळख असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले.

माझा आवडता नेता – जवाहरलाल नेहरू निबंध ( Jawaharlal Nehru Essay in Marathi ) हा निबंध तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा…

Leave a Comment