डिजिटल साक्षरता मराठी निबंध | Digital Saksharta Marathi Nibandh

प्रस्तुत लेख हा डिजिटल साक्षरता या विषयावर मराठी निबंध (Digital Saksharta Marathi Nibandh) आहे. सध्या फक्त लिहता – वाचता येणे महत्त्वाचे नाही तर डिजिटली साक्षर होणे गरजेचे आहे, अशा आशयाचा हा निबंध आहे.

डिजिटल साक्षरता – काळाची गरज निबंध | Digital Saksharta Nibandh Marathi |

डिजिटल साक्षरता हा शब्द नव्यानेच रुजू झालेला आहे. “डिजिटल साक्षरता म्हणजे काय?”, तर आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपण इलेक्ट्रॉनिक संसाधने जसे की मोबाईल्स आणि संगणक निर्माण करू शकलेलो आहे. त्याच संसाधनांचा संपूर्णतः वापर करण्याची क्षमता म्हणजे डिजिटल साक्षरता!

सध्या डिजिटल इंडिया ही संकल्पना आपण सातत्याने ऐकत आहोत. प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आणि सेवा ऑनलाईन उपलब्ध झालेली आहे. त्याप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण व सोशल मीडिया या स्तरांवर देखील आपल्याला मोबाईल अथवा संगणक व्यवस्थितरित्या वापरता येणे, ही काळाची गरज बनलेली आहे.

सध्या प्रत्येक नागरिकाचा संबंध इंटरनेट जगताशी येतच आहे. त्यासाठी विशिष्ट संगणकीय भाषा आणि काही तांत्रिक बाबी व संकल्पना लक्षात येणे आवश्यक असते, त्याशिवाय तुम्ही सहजरीत्या डिजिटल साक्षर बनणे अशक्य आहे.

संपूर्ण जग इंटरनेटमुळे जवळ आलेले आहे. इंटरनेटचा वाढता वापर पाहता बहुसंख्य लोकांना त्याचा वापर जर करता आला तर एक वेगळीच इंटरनेट दुनिया निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. त्यासाठी भविष्यात सर्व लोक डिजिटली साक्षर करणे आवश्यक आहे.

तांत्रिक संसाधने वापरून पाहिल्याशिवाय आपल्याला त्यांचा वापर सहजरीत्या करता येत नाही. सध्या शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढी ही शिक्षण तसेच इतर सुविधा ऑनलाईन पद्धतीने हाताळत आहेत. त्यांच्यासाठी डिजिटल साक्षर बनणे अत्यंत सोप्पे आहे. परंतु ज्येष्ठ नागरिक हे मोबाईल व इतर इंटरनेट सुविधा वापरताना गोंधळलेले आढळतात.

व्यक्ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सरासरी दोन ते तीन तास तरी मोबाईल इंटरनेटचा वापर करतोच. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाईन खरेदी – विक्री, बँकिंग सुविधा, टेलिव्हिजन सुविधा, आरोग्य सुविधा, ऑनलाईन शिक्षण तसेच प्रवासासाठी ऑनलाईन बुकींग अशा सर्व बाबी लोकांसाठी सहज झालेल्या आहेत.

डिजिटल साक्षर होताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण संगणक आणि मोबाईलचा वाढता वापर हा डोळे, मेंदू, आणि त्वचा यांवर विपरीत परिणाम करत आहे. त्यासाठी आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन गरजेपुरते डिजिटल दुनियेत फिरून येणे वावगे ठरणार नाही.

मागील काही वर्षांपूर्वी सर्व नागरिक साक्षर करणे हे ध्येय होते. परंतु सध्या मोबाईल, संगणक आणि इंटरनेटमुळे लोकांना डिजिटल साक्षर करणे हे ध्येय समोर आहे. तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्य दिवसेंदिवस सोयीस्कर आणि सुदृढ बनत चालले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल साक्षरता ही संकल्पना सर्वत्र राबवणे अत्यावश्यक आहे.

तुम्हाला डिजिटल साक्षरता हा मराठी निबंध (Digital Saksharta Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment