जागतिक क्षयरोग दिन – मराठी माहिती | Jagatik Kshayarog Din Mahiti |

प्रश्न – जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – २४ मार्च.

प्रस्तुत लेख हा जागतिक क्षयरोग दिनाबद्दल (Jagatik Kshayarog Din Mahiti Marathi) मराठी माहिती आहे. या लेखात जागतिक क्षयरोग दिनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे आणि क्षयरोगाबद्दल प्राथमिक माहिती सांगण्यात आलेली आहे.

जागतिक क्षयरोग दिन माहिती मराठी | World Tuberculosis Day Information In Marathi |

जागतिक क्षयरोग दिनाचे महत्त्व –

• क्षयरोग हा “मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस” नामक जंतूमुळे होणारा एक संसर्गजन्य असा आजार आहे. या रोगाला टीबी असे देखील संबोधतात. सुरुवातीला हा रोग अत्यंत दुर्धर समजला जाई परंतु त्यावर आता उपचार शक्य आहेत.

• इ. स. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्या विषयीचा प्रबंध त्यांनी मांडल्यानंतर दिनांक २४ मार्च रोजी जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत त्यास मान्यता मिळाली. त्यामुळे २४ मार्च हा संपूर्ण जगभरात “जागतिक क्षयरोग दिन” म्हणून साजरा केला जातो.

• क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने बाधित व्यक्तीकडून इतरांना त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षयरोगाची लक्षणे काय आहेत, उपचार पद्धती कशी असते, तो कसा बरा होऊ शकतो अशा बाबी सर्वांनी जाणून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे क्षयरोगाबद्दल सर्व ठिकाणी जनजागृती व्हावी अशा उद्देशाने जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो.

क्षयरोग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे –

• क्षयरोगाचे जिवाणू हे मानवी शरीरात वास्तव्य करतात परंतु रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास त्यांची बाधा शरीरात फुफ्फुसाला होते.

• ज्या व्यक्तीला क्षयरोग (टीबी) झालेला असेल, त्यामार्फत रोगाचा प्रसार इतरत्र होऊ शकतो. तो व्यक्ती बोलला, खोकला, शिंकला किंवा थुंकला तरी जंतूसंसर्ग सर्वत्र होत असतो. अशा संसर्गाने आसपासच्या व्यक्तींना त्याची बाधा होऊन क्षयरोग सर्वत्र पसरतो.

• ज्या व्यक्तीला बाधित व्यक्तीकडून संसर्ग झाला असेल त्या व्यक्तीची जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर त्यालाही क्षयरोगाची बाधा होत असते. या रोगात व्यक्तीला शक्यतो खालील लक्षणे आढळतात –

१. दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला असणे.
२. भूक मंदावणे त्यामुळे वजन कमी होणे.
३. अधूनमधून ताप येणे.
४. छातीत दुखणे व रात्री घाम येणे.

• वरील लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रात खोकल्याची लाळ तपासायला हवी. फुफ्फुसांशिवाय मज्जासंस्था, आतडे, हाडे व सांधे या अवयवांचा देखील क्षयरोग होत असतो.

• या आजारात सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे संपूर्ण उपचार घेणे. हा आजार बरा होण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने व्यक्तीला संयम दाखवणे आवश्यक ठरते. उपचार मधूनच बंद केल्यास क्षयरोग पुन्हा उद्भवू शकतो.

क्षयरोग नियंत्रण –

क्षयरोग उपचारासाठी “डॉट्स” हा भारत सरकारतर्फे राबवण्यात येणारा राबवला जाणारा उपक्रम आहे. या उपक्रमात सहभागी झाल्यास क्षयरोगाची मोफत तपासणी व मोफत उपचार सरकारी दवाखान्यात उपलब्ध होतात.

डॉट्स (डायरेक्टली ऑब्जर्व्ह ट्रीटमेंट वुईथ शॉर्टटर्म केमोथेरपी) उपक्रमात सामील झाल्यास संपूर्ण वेळ म्हणजे सहा ते आठ महिने उपचार घेणे अत्यावश्यक आहे.

जागतिक क्षयरोग दिन कसा साजरा केला जातो –

• क्षयरोगाची बाधा ही सर्वांसाठी घातक असल्याने त्याचे गांभीर्य समजून येण्यासाठी सर्व जगभरात आरोग्य संघटना, सरकारी दवाखाने, वैद्यकीय संस्था हा दिवस अत्यंत उपक्रमशील पध्दतीने साजरा करतात.

• सध्या उपलब्ध असलेली सर्व प्रसारमाध्यमे व सोशल मीडिया यांचा उपयोग करून जागतिक स्तरावर सर्व लोकांना क्षयरोगाविषयी प्राथमिक माहिती पुरवली जाते. तसेच क्षयरोगाची मोफत तपासणी उपलब्ध करून दिली जाते.

• क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्या आजाराबाबत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जागतिक क्षयरोग दिनाचे महत्त्व सर्वांना स्पष्ट होणे गरजेचे आहे.

जागतिक क्षयरोग दिन – मराठी माहिती (Jagatik Kshayarog Din Mahiti Marathi) हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Leave a Comment