प्रस्तुत लेख हा कुत्रा – १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay on Dog in Marathi) आहे. कुत्रा या पाळीव प्राण्याविषयीची माहिती अत्यंत मुद्देसूद आणि सोप्या भाषेत या निबंधात दिलेली आहे.
माझा आवडता प्राणी – कुत्रा | १० ओळी मराठी निबंध | Kutra 10 Oli Marathi Nibandh |
१. कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक पाळीव प्राणी असल्याने माझा तो आवडता प्राणी आहे.
२. संपूर्ण जगभरात कुत्र्याच्या विविध जाती आढळतात. जातीनिहाय त्यांचा आकार आणि रंग वेगवेगळा असतो.
३. कुत्र्याला चार पाय, दोन मोठे कान आणि एक शेपटी असते.
४. कुत्रा हा अतिसंवेदनशील प्राणी आहे. त्याची गंध घेण्याची क्षमता चांगली असते.
५. कुत्रा आपल्या घराचे संरक्षण करतो. घरातील सर्व लोकांना तो बरोबर लक्षात ठेवतो.
६. इतर अनोळखी व्यक्तीचे किंवा प्राण्याचे घरी आगमन झाल्यास त्यांच्यावर तो भुंकतो.
७. कुत्रा गंधावरून लोक ओळखू शकतो त्यामुळे विशिष्ट जातीची कुत्री पोलिस आणि इतर संरक्षण दलात वापरली जातात.
८. कुत्रा शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी आहे. परंतु तो शिकार करून खात नाही.
९. कुत्रा प्राण्यांमध्ये नर जातीला “कुत्रा” तर मादीला “कुत्री” असे संबोधतात.
१०. कुत्रा सोबत असल्यास अनेक लोक मानसिक सुख अनुभव करतात. त्यामुळे कुत्री घरात पाळणे ही सध्या प्रतिष्ठेची बाब झालेली आहे.
तुम्हाला कुत्रा – १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay on Dog in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
वरील निबंध Dog Essay In Marathi – 10 lines असाही सर्च केला जातो.