झाड – १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay On Tree in Marathi |

प्रस्तुत लेख हा झाड – १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay On Tree in Marathi) आहे. झाडाविषयी सर्व महत्त्वपूर्ण माहिती या निबंधात दिलेली आहे.

झाड – १० ओळी मराठी निबंध | Tree Essay In Marathi 10 Lines |

१. झाड हा मानवाच्या जीवनातील आणि निसर्गातील अविभाज्य व महत्त्वपूर्ण घटक आहे.

२. झाड आपल्याला ऑक्सिजन देते आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते.

३. झाडांपासून आपल्याला फळे – फुले तसेच सावली मिळते.

४. झाडांच्या लाकडांचा उपयोग इमारती व घरे बांधण्यासाठी होतो.

५. आपल्याला शुद्ध व निरोगी वातावरण हवे असेल तर झाडे लावणे खूपच गरजेचे आहे.

६. झाडाची निर्मिती ही फळांमधील बियांपासून होत असते. योग्य प्रकारची जमीन आणि पाणी मिळाल्यास झाडांची वाढ चांगली होते.

७. झाडे मोठी होण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी जात असतो त्यासाठी त्यांना तोडणे हे अत्यंत चुकीचे कृत्य आहे.

८. सध्या वृक्षतोड वाढलेली आहे त्यामुळे प्रदूषण, मातीची धूप, पाऊसाची अनियमितता आणि तापमानवाढ अशा समस्या डोके वर काढत आहेत.

९. झाडे म्हणजे मानवासाठी आणि इतर सजीवांसाठी निसर्गाचे वरदानच आहे.

१०. मानवाला होणारे झाडाचे फायदे जाणून घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञतापूर्वक वागणे सध्याची गरज बनलेली आहे.

तुम्हाला झाड १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay On Tree in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment