लालबहादूर शास्त्री – १० ओळी निबंध | 10 Lines Essay Lal Bahadur Shastri |

प्रस्तुत लेख हा लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay on Lal Bahadur Shastri in Marathi) आहे. त्यांच्या जीवन कर्तृत्वाची माहिती देणारा हा निबंध अत्यंत मुद्देसूद आणि सोप्या भाषेत मांडलेला आहे.

लालबहादूर शास्त्री निबंध | Lal Bahadur Shastri 10 Oli Marathi Nibandh |

१. लालबहादूर शास्त्री हे स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी, कार्यकर्ते, राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते.

२. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत झाला.

३. शास्त्रींच्या आईचे नाव रामदुलारी तर वडिलांचे नाव शारदाप्रसाद असे होते.

४. शास्त्री यांनी अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांत विनावेतन किंवा गरजेपुरता अल्प मोबदला घेऊन काम केले.

५. महात्मा गांधी, लाला लजपत राय आणि पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता.

६. स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेक वेळा अटक झाली. त्यांनी यावेळी एकूण नऊ वर्षांचा कारावास भोगला.

७. १९५७ ते १९६४ या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळात संचार व परिवहन, उद्योग व व्यापार, गृह इ. खाती व्यवस्थितरीत्या सांभाळली.

८. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेस संसदीय सभेने ९ जून १९६४ रोजी लाल बहादुर शास्त्री यांची पंतप्रधान पदावर एकमताने नियुक्ती केली.

९. ११ जानेवारी १९६६ रोजी शास्त्रींचे हृदयविकाराने निधन झाले.

१०. भारत सरकारने “भारतरत्न” हा पुरस्कार देऊन त्यांचा मरणोत्तर सन्मान केला.

तुम्हाला लालबहादूर शास्त्री १० ओळी मराठी निबंध (10 Lines Essay on Lal Bahadur Shastri In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment