वामकुक्षी – मराठी माहिती | Vamkukshi Information In Marathi |

झोप ही मानवाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची बाब आहे शिवाय ती जास्त झाल्यावर अनेक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. असाच एक झोपेचा प्रकार आहे वामकुक्षी!

वामकुक्षी हा शब्दच नवखा असल्यासारखा वाटतो. परंतु हा शब्द झोपे संदर्भात असल्याने तुम्हाला त्याविषयी जाणून घेणे नक्कीच आवडेल. चला तर मग पाहुयात वामकुक्षी म्हणजे काय? (What is Vamkukshi in marathi)

वामकुक्षी मराठी माहिती | Vamkukshi Information In Marathi |

वामकुक्षी दुपारी अल्प वेळेसाठी घेतल्या जाणाऱ्या झोपेस म्हणतात. वामकुक्षी 15 ते 20 मिनिटांची असते. शक्यतो दुपारी जेवल्यानंतर ती डाव्या कुशीवर झोपून घेतली जाते.

वामकुक्षीचे फायदे –

१. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी नक्कीच वामकुक्षी घ्यावी. रक्तप्रवाह सुरळीत होतोच शिवाय हृदयावरील अतिरिक्त ताण हलका होण्यास मदत होते.

२. आपण जर डाव्या कुशीवर झोपलो तर जठराग्नी अत्यंत सक्षमतेने खाल्लेले अन्न पचवत असतो. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर इतर काहीही काम न करता फक्त डाव्या कुशीवर अल्पशी निद्रा घ्यावी.

३. दुपारी जेवणानंतर जाणवणारा थकवा फक्त वामकुक्षी घेतल्याने कमी होतो आणि पुन्हा नव्या ऊर्जेचा संचात होऊन आपण कामाला लागतो.

४. वामकुक्षी ही जास्त वेळेची नसावी, नाहीतर उत्साह वाढण्याऐवजी शरीरातील आळस वाढीला लागेल. वामकुक्षी पूर्ण झाल्यानंतर आपोआप जाग येते त्यानंतर एक प्रकारची तृप्ती जाणवते.

५. रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. रक्तदाब नियंत्रित राहतो.

तुम्हाला वामकुक्षी मराठी माहिती (Vamkukshi Information in Marathi)  हा मराठी लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

प्रस्तुत माहिती तुम्ही पुढील keywords वापरून देखील सर्च करू शकता….

Vamkukshi Information in Marathi
• Vamkukshi in Marathi
• Vamkukshi Marathi Mahiti

Leave a Comment