युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

महान क्रिकेटपटू युवराज सिंगने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे ठरवले. त्याच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीचा काळ शेवट झाला. त्याने क्रिकेट विश्वचषकासह काही मोठ्या ट्रॉफी जिंकलेल्या आहेत तसेच भयानक कर्करोगाला सुद्धा पराभूत केले. 2011 च्या विश्वचषक नायकाने सांगितले की, मुंबईतील पत्रकार परिषदेत सेवानिवृत्तीची घोषणा करत आहे आणि मी स्वतः हा निर्णय घेतला आहे.

त्याने पत्रकार परिषदेत सांगितले कि “सुमारे 17 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो तसेच या खेळाने मला कसे लढायचे आणि पडल्यानंतर कसे पुन्हा उभे राहायचे हे शिकवले.

युवराजने पुढे म्हटले की, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याबद्दल त्याने कधीही चिंता केली नाही. सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संघात त्याने कशी सुरुवात केली आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यासारख्या दिग्गजांसोबत केलेला प्रवास त्याने आठवला.

त्याने “महेंद्रसिंह धोनीच्या शानदार captainship चे कौतुक करून विश्वचषकच्या आठवणी ताज्या केल्या. 28 वर्षानंतर विषवचशक जिंकून इतिहास घडवलेल्या संघाचा भाग असण्यापेक्षा काहीच मोठे नाही. “हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे … या साठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही,” असे युवराज म्हणाला.

याआधीच्या निवेदनात युवराजने आयसीसी मान्यताप्राप्त विदेशी टी -20 लीगमध्ये फ्रीलान्स करियरचा पाठपुरावा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

सुपर 30 ट्रेलर: ऋतिक रोशन आनंद कुमार यांच्या भूमिकेत.

त्याने 304 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8701 धावा केल्या आणि 40 कसोटीत त्याने 1900 धावा केल्या. भारतातील महानतम मर्यादित षटकांच्या क्रिकेटपटूंपैकी एक, युवराजने 2000 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द बांगलादेशात पदार्पण केले आणि 80 चेंडूंत त्याने 84 धावा केल्या होत्या.

2002 साली नॅव्हवेस्ट सीरीझमध्ये त्याने पुन्हा एकदा चमक दाखवली. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड लवकर आऊट झाल्यानंतर युवराज आणि मोहम्मद कैफ यांनी संघासाठी विजय निश्चित केला होता.

Leave a Comment