मित्रांचा दबाव जाणवतो …

मित्रांच्या दबावाला बळी पडणे ही वरवरची गोष्ट नाही तर आपण तसे दबाव टाकणारे मित्रच निवडले आहेत ही सत्य परिस्थिती स्वीकारावी लागेल.

मित्र म्हटले की जीव की प्राण! असा गैरसमज आपणाला अनेकवेळा होत असतो. चित्रपट, मालिका, आणि वेबसीरिज मधून आपल्याला वारंवार तसे दाखवले सुद्धा जाते. अशा पद्धतीचे संस्कार सध्याच्या पिढीत खूप संक्रमित होत आहेत.

मित्र असणे ही खूपच सुखदायी गोष्ट आहे. ज्या लोकांच्या सवयी किंवा व्यसनं समान असतात असे लोक एकमेकांचे मित्र असतात. त्यामुळे मित्रता ही वेगवेगळ्या स्तरावर अनुभवली जाते.
      
काही लोक जे चांगल्या सवयींमुळे चांगले मित्र असतील ते दूर असले तरी त्यांची जवळीक मात्र कायम असते. ते स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांचा गैरवापर करत नाहीत. याउलट दोस्ती ही कल्पना काहीतरी भन्नाट आहे असे समजून जे लोक जीवन जगतात, ते एकमेकांच्या आयुष्यातील स्वातंत्र्य आणि वेळ हिरावून घेत असतात.
     
व्यक्ती जेवढी मनाने चांगली असेल तेवढीच विश्वासू देखील असते. अशा लोकांची मैत्री ही कधी दबाव वाटत नाही. याउलट जे लोक सतत कलहग्रस्त असतील, ज्यांच्या घरातील लोक उद्धट असतील आणि तशाच संस्कारांनी तेसुद्धा उद्धट बनले असतील, अशा लोकांची मैत्री म्हणजे नुसता टाईमपास आणि दबावच दबाव असतो.
    
त्यामुळे स्वतःचे जीवन घडवणे, जीवनात काहीतरी ध्येय असणे खूप गरजेचे आहे. अशा ध्येयाने प्रेरित लोक व्यर्थ आणि निरर्थक मैत्रीला बळी पडत नाहीत. उलट ते नेहमी उत्तम लोकांच्या संगतीत वेळ घालवतात. तुमच्या जीवनात काही चांगल्या सवयी आणि ध्येय असूद्या ज्यामुळे तुमचे जीवन चांगले होईल. मग अशाच सवयी असणाऱ्या व्यक्तींसोबत मैत्री करा.
    
ध्येय स्पष्ट नसेल, आयुष्यात महत्त्वपूर्ण असे काही करण्यास नसेल तर मात्र मित्रांच्या संगतीत वेळ घालवणे एवढे एकच काम उरते. मग तेही रिकामटेकडे आणि आपणही! मग जगण्यासाठी जी प्रेरणा आणि ऊर्जा आवश्यक असते ती नसल्याने एकमेकांवर दबाव टाकला जातो. विनाकारण भावनिक होऊन एकमेकांना मानसिक त्रास देणे सुरू होते.
     
अशा वर्तनातून मग व्यसन सुद्धा केले जाऊ शकते. तशा प्रकारचे चित्रण आपण टीव्ही, मोबाईलवर पाहतच असतो. मित्र म्हटले की उनाडक्या करत फिरणे, कॉलेजमध्ये देखील दंगामस्ती करणे, मोठ्या व्यक्तींचा आदर न करणे, भांडणतंटे करणे, वासनेला प्रेमाचे रूप देऊन फसवणूक करणे, अशा सर्व प्रकारच्या गोष्टी चित्रपटातून आपला आवडता हिरो करत असतो मग आपण कसे काय मागे राहू शकू?
    
अशा वर्तणुकीत मोबाईलवर सतत टाईमपास करणे, सोशल मीडियाचा अतिवापर, सिनेमे, वेबसेरीज मधून दाखवले गेलेले मैत्रीचे अवास्तव रूप खरे मानणे असे प्रकार सुरू होतात. अशा संस्कारांनी युक्त व्यक्ती मैत्रीत, प्रेमात, नात्यात फक्त दबाव आणि दबावच निर्माण करते.

आपण कधी दबावाला बळी पडू शकतो?

१. आपल्या सवयीच्या आणि स्वभावाच्या विपरीत व्यक्तीशी मैत्री केल्यावर आपण दबावाला बळी पडू शकतो.

२. नवीन मैत्री असेल तर नाही म्हणता येत नाही त्यामुळे सुरुवातीला अशा नाहक मैत्रीचा दबाव तुम्ही सहन करू शकता.

Leave a Comment